कळंब – येथे कळंब तालुका कॉंग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली असून अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या बैठकीसाठी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष नय्युम तांबोळी, तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार,महिला जिल्हाध्यक्ष ज्योती सपाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका काँग्रेस कमिटी मध्यवर्ती कार्यालय मार्केट यार्ड येथे काँग्रेस पक्षाची नियोजित बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.यामध्ये विशाल वाघमारे,सतीश लोंढे,विकास कसबे,मेहबूब शेख,अक्षय वाघमारे,लखन बचुटे इत्यादी कार्यकर्त्यांनी पक्षांमध्ये प्रवेश केला. तर बैठकीमध्ये गावनिहाय मंडळ समिती व बी एल ए एल नियुक्ती संदर्भात गावनिहाय आढावा घेण्यात आला.नूतन महिला जिल्हा अध्यक्षपदी ज्योती सपाटे यांची निवड झाल्या मुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष नय्युम तांबोळी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नवीन कार्यकर्त्यांना पदनियुक्तही देण्यात आल्या.विशाल वाघमारे यांना कळंब शहर कामगार सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर अल्पसंख्याक सेलच्या शहर उपाध्यक्षपदी अमजद बागवान यांची निवड करण्यात आली.तर मुजाहिद मुजावर यांची तालुका उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल पदी निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघासाठी तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या नावाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव जिल्हा काँग्रेस कमिटी व प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याकडे पाठवण्याचे सर्व मताने मान्य करण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष शंकर करंजकर,जिल्हा उपाध्यक्ष अशोक भातलवंडे, जिल्हा सरचिटणीस बप्पा मैंदाड,नूतन जिल्हा अध्यक्ष महिला ज्योती सपाटे,शहराध्यक्ष रवींद्र ओझा ,मार्केट कमिटीचे संचालक हरिचंद कुंभार,विधानसभा युवक अध्यक्ष शशिकांत निरफळ,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शहाजान शिकलगार, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष कलीम तांबोळी,किसान सेलचे अध्यक्ष विलास करंजकर, महिला तालुकाध्यक्ष अंजली ढवळे, शहर उपाध्यक्ष अर्चना नकाते संध्या कदम,संगीता सातपुते,शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड,चेतन कुंभार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन शशिकांत निरफळ यांनी केले.
More Stories
संस्थामाता सुमनताई मोहेकर स्मृतिदिन विशेषांकाचे उत्साहात वितरण
साक्षी कोचिंग क्लासेसमध्ये मुख्याध्यापक आनंद रामटेके यांचे उत्साहात स्वागत
अजित पिंगळे यांची शिवसेना धाराशिव–कळंब जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती