August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.07 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 173 कारवाया करुन 1,56,800 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-दिपक शिवराज दानाई, वय 48 वर्षे, रा.उस्तुरी निलंगा जि. लातुर हे दि.06.09.2024 रोजी 17.40 वा. सु. आपल्या ताब्यातील महिंद्रा जिप क्र एमएच 12 जे.यु 6376 ही राष्ट्रीय महामार्ग क्र 65 सोलापूर हैद्राबाद महामार्गवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-शाहीद करीम शेख, वय 30 वर्षे, रा.कार्ला ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 70,000₹किंमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.झेड. 3202 ही दि.25.08.2024 रोजी 23.00 ते दि.26.08.2024 रोजी 06.00 वा. सु. कार्ला येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शाहीद शेख यांनी दि.07.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-धीरज देशमुख, योगेश साखरे, आकाश देशमुख, धीरज कारभारी, सुरज देशमुख, प्रद्युन गंगाधर म्हेत्रे, बाळु व्यंकट पाटील, विशाल कारभारी सर्व रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 06.09.2024 रोजी 21.00 वा. सु. गुंजोटी बाहेर पेठ येथील जब्बार शेख यांचे किरणादुकाना समोर गुंजोटी येथे फिर्यादी नामे- एजाज अब्दुल हक्क काझी, वय 28 वर्षे, रा. बाहेर पेठ गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव यांना तु मला डोळे वटारुन का पाहिलास असे म्हणुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटर व बेल्टने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-एजाज काझी यांनी दि.07.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 118(1), 352, न्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-प्रमोद पांडुरंग सुर्यवंशी, शंतू भास्कर सुर्यवंशी दोघे रा. बाबळसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.01.09.2024 रोजी 19.00 वा. सु. बाबळसुर शिवारातील प्रताप वामनराव जाधव यांचे शेताजवळ फिर्यादी नामे- तानाजी जगन्नाथ माने, वय 48 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव हे घेवून जात असलेल्या बैलगाडीला छत्रीने हुसकावून लावून ते बैल रोड सोडून पांदीचे रस्त्याने गेल्यामुळे फिर्यादी नमुद आरोपीस समजावून सांगण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बैलगाडीचे खिळाने मारहाण करुन बरगडी फॅक्चर करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-तानाजी माने यांनी दि.07.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 352, 3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-विशाल मनोज पिस्के, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.07.09.2024 रोजी 20.00 वा. सु. बसस्थानक नळदुर्ग रोडलगत भाजी दुकानासमोर फिर्यादी नामे- मोहन शंताराम लोहार, वय 29 वर्षे, रा. ब्राम्हण गल्ली नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मोहन लोहार यांनी दि.07.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 352, 351(2 )अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 28 छापे.”
  • मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन काल शनिवारी दि.07.09.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 28 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 940 लि. द्रवपदार्थ नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 730 लि. गावठी दारु, सुमारे 430 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण 575 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 7, 17, 575 ₹ आहे. यावरुन 28 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 28 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1)भुम पो ठाणेच्या पथकाने 6 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-सिंधुबाई बलभीम काळे, वय 50 वर्षे, रा. पारधी पिढी ता. भुम जि. धाराशिव या 16.50 वा. सु. कल्याणनगर पारधीपिढी कडे जाणारे रोडलगत अंदाजे 2,350 ₹ किंमतीची 25 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-साखरबाई दत्ता पवार, वय 45 वर्षे, रा. पारधीपिढी ता. भुम जि. धाराशिव या 16.00 वा. सु. भुम येथे बसस्थानकाचे गेटजवळ टपरी समोर अंदाजे 4,100 ₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे- नानीबाई, संजय काळे, वय 38 वर्षे, रा.पारधी पिढी भुम ता.भुम जि. धाराशिव या 15.15 वा. सु. भुम बसस्थानकाचे प्रवेश द्वाराजवळ अंदाजे 3,100₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-प्रेमा बाजीराव काळे, वय 65 वर्षे, रा. पारधी पिढी भुम ता. भुम जि. धाराशिव या 17.45 वा. सु. भुम येथील आठवडी बाजारातील मच्छीमार्कट येथे अंदाजे 2,250₹ किंमतीची 22 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-पुनम शाम काळे, वय 23, वर्षे, रा. सोनगिरी ता. भुम जि. धाराशिव या 17.50 वा. सु.गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 2,200 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-दादा बाप्पा काळे, वय 46, वर्षे, रा. वंजारवाडी ता. भुम जि. धाराशिव हे 18.20 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 2,500 ₹ किंमतीची 25 लि. गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
  • 2)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-जनाबाई दिनकर चव्हाण, वय 45 वर्षे, रा. पेट्रोपंप ढोकी ता. जि. धाराशिव या 13.15 वा. सु ढोकी पेट्रोलपंप चौक ते केळंब रोडलगत अंदाजे 17, 500 ₹ किंमतीचे 200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-उषा मोतीराम चव्हाण, वय 24 वर्षे, रा. पेट्रोलपंप ढोकी ता. जि. धाराशिव या 13.15 वा. सु ढोकी पेट्रोलपंप चौक ते केळंब रोडलगत अंदाजे 30 200 ₹ किंमतीचे 400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-उमेश युनुस शेख , वय 34 वर्षे,रा. इंदिरानगर मंगरुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 16.30 वा. सु मंगरुळ शाळेजवळील तुळजाभवानी हॉटेलचे पाठीमागे अंदाजे 4,570 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 40 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 3)येरमाळा पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-तोळाबाई श्रीमंत काळे, वय 60 वर्षे, रा. चुन्याच्या रानाजवळ येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे 07.55 वा. सु गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 24,400₹ किंमतीची 340 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 4)उमरगा पो. ठाणाच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-प्रभाकर लक्ष्मण राठोड, वय 25 वर्षे, रा. व्यंकटेश नगर कदेरा ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.00 वा. सु व्यंकटेश नगर तांडा कदेर येथे अंदाजे 20,000₹ किंमतीची 200 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-बारकाबाई प्रताप लोखंडे, औराद ता. उमरगा जि. धाराशिव या 15.10 वा. सु भिमनगर औराद येथे अंदाजे 4,000₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-संगप्पा गुरप्पा माळी, वय 42 वर्षे, रा. बॅक कॉलनी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.00 वा. सु डिग्गी रोड जवळील मेडप्लस मेडीकलचे बाजूस उमरगा येथे अंदाजे 3,240₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 18 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 5)कळंब पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-मारुती भगवान जोंधळे, वय 40 वर्षे, रा.भिमनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 09.18 वा. सु संजीवनी वाइ्रन शॉप समोरील मोकळ्या जागेत श्रध्दा टपरीच्या बाजूस कळंब येथे अंदाजे 6,090₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 6)वाशी पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-साखरबाई माणिक पवार, वय 55 वर्षे, रा. पारगाव, ता. वाशी जि. धाराशिव हे 16.30 वा. सु लांजेश्वर येथील राहते घराचे पाठीमागे अंदाजे 2,100 ₹ किंमतीची 25 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 7)मुरुम पो. ठाणाच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-भास्कर कुंडलिक एकडगे, वय 55 वर्षे, रा. येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.00 वा. सु येणेगुर येथे बस्थानक जवळ असलेले पत्री शेड समोर अंदाजे 3,000 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-गणेश उर्फ महेश सुरेश इंगळे, वय 37 वर्षे, रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव हे 19.05 वा. सु आलुर येथे अक्कलकोट जाणारे रोडचे लगत अंदाजे 2,200 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 8)नळदुर्ग पो.ठाणाच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-विकास लक्ष्मण चिंचोळ, वय 30 वर्षे, रा. शिरगापूर पो.इटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 18.45 वा. सु शिरगापूर ते उमरगा चिवरी रोडच्या बाजूस अंदाजे 1,000 ₹ किंमतीची 20 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-श्रिनिवास लिंगच्या दोडलेवार, वय 55 वर्षे, रा.रामसिंगपुर करवान आसिफनगर ता. जि. हैद्राबाद ह.मु. अयोध्यानगर आकाश हॉस्पीटल समोर सोलापुर हे 19.30 वा. सु एनएच 65 केरुर पेट्रोलपंप बाजूला दिपक हॉटेल समोर अंदाजे 1,365 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 39 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-सचिन शिवराम झरवाडकर, वय 40 वर्षे, रा. हान्नुर ता. अक्कलकोट जि. सोलापूर हे 19.00 वा. सु प्रॉपर इटकळ येथे अक्कलकोट रोडलगत अंदाजे 900 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 9)शिराढोण पो.ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-जावेद जाफर पठाण, वय 50 वर्षे, रा. मंगरुळ ता. कळंब जि. धाराशिव हे 21.00 वा. सु एस हॉटेल शेजारी जवळा पाटी ढोकी कळंब रोडलगत अंदाजे 560 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 8 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 10)अंबी पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- बंडु केरबा शेळके, वय 42 वर्षे, रा.कृष्णापुर ता. भुम जि. धाराशिव हे 13.45 ते 13.55 वा. सु अंबी चौकात ते पाथरुड गावचे शिवारात भुम जामखेड रोडलगत अंदाजे 5,55,020 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 448 सिलबंद बाटल्या सह लाल रंगाची महिंद्रा युटी व्ही 300 क्र एमएच 25 एएल 4037 व रोख रक्कम 37,660 अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
  • 11)धाराशिव शहर पो.ठाणाच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-रिजवान अमीन शेख, वय 26 वर्षे, रा. स्टार हॉटेलच्या पाठीमागे उमर मोहल्ला धाराशिव ता.जि. धाराशिव हे 14.20 वा. सु धाराशिव शहरातील झोरी गल्ली शेजारी अलीम बिर्याधी हाउसचे बाजूला अंदाजे 14,700 ₹ किंमतीची 200 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-धनंजय बापू विधाते, वय 40 वर्षे, रा.शेकापुर ता. जि. धाराशिव हे 18.00 वा. सु रजनीकांत माळळे यांचे पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 6,600 ₹ किंमतीची 110 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 12)बेंबळी पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- चंद्रकांत तुकाय्या, वय 43 वर्षे, रा.काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु. काजळा ता. जि. धाराशिव हे 18.30 वा. सु चिखली ते धाराशिव रोडवर इंडीयन ऑईल पेट्रोलपंप जवळ मेजरसाब कॉम्पलेक्स लगत अंदाजे 9,200 ₹ किंमतीची 90 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
  • 13)लोहारा पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- संतोष शंकर थोरात, वय 40 वर्षे, रा.धानुरी ता. लोहारा जि. धाराशिव हे 19.20 वा. सु धानुरी येथे आपल्या पत्र्याच्या शेडसमोर अंदाजे 960 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 14)तुळजापूर पो.ठाणाच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-धिरज नानासाहेब नरसुडे, वय 36 वर्षे, रा. वासुदेव गल्ली तुळजापूर ता. जि. धाराशिव हे 17.15 वा. सु नव्या बसस्थानक समोरील कदम यांचे शेताजवळ अंदाजे 6,000₹ किंमतीची 120 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-आमोल माणिक पवार, वय 34 वर्षे, रा.खंडाळा ता.तुळजापूर जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. समोर खंडाळा येथे अंदाजे 6,150 ₹ किंमतीची 60 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
error: Content is protected !!