कळंब – माळी विकास मिशन च्या पाठपुराव्यास राज्य सरकारने योग्य प्रतिसाद देत तीर्थ क्षेत्र अरण ला अ दर्जा दिला याबद्दल माळी विकास मिशन महाराष्ट्र च्या वतीने अभिनंदन करण्यात आले. मागील महिन्यात चार ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र अरण येथे माळी समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास हजारो च्या संख्येने माळी समाज अरण या ठिकाणी उपस्थित होता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ व गृह निर्माण आणि इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे यांच्या उपस्थितीत माळी समाजाचे सर्व आजी माजी आमदार, सर्व संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि संत सावता महाराज भक्त परिवार यांनी मंत्री यांना माळी समाजाच्या विविध मागण्या सादर केल्या होत्या.अनेक वर्षांपासून प्रमुख असलेली तीर्थ क्षेत्राला अ दर्जा सहित भव्य शिल्प सृष्टी, शंभर खोल्याचे सुसज्ज भक्त निवास, आषाढी कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुक्काम सभामंडप, दर्शनमंडप, संत सावता महाराज आयुर्वेदिक संशोधन केंद्र इत्यादी मागण्या मांडल्या असता सन्माननीय मंत्री महोदय यांनी एका महिन्यात सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उपस्थित समुदायला दिले होते. मंत्री छगनरावजी भुजबळ आणि अतुलजी सावे यांनी याचा पाठपुरावा करत दि. 5/9/2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वरील सर्व प्रश्न मांडून अ दर्जा आणि सुमारे शंभर कोटी रुपये राखीव निधीची तरतूद करून घेतली याबद्दल संपुर्ण महाराष्ट्र भरातील माळी समुदायच्या स्वप्नाची पूर्तता झाली आहे. यासाठी माळी विकास मिशन महाराष्ट्र ने समाजातील सर्व संघटना अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व पक्षीय माळी नेत्यांना आवाहन करून समाजाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यास सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. समता परिषद, एकता परिषद,सावता परिषद, माळी सेवा संघ महाराष्ट्र,अखिल भारतीय माळी महासंघ, महाराष्ट्र माळी महासंघ, सावता सेना,सावित्री शक्ती पीठ, महात्मा फुले ब्रिगेड, युवा दल यांनी एकत्र येऊन एकीचे दर्शन घडविले आणि अनेक वर्षाचे स्वप्न साकार झाले याबद्दल माळी विकास मिशन महाराष्ट्र चे समन्वयक अशोक भुजबळ, निवृत्त ए सी पी सुरेश जाधव, इंजि वासुदेवराव चौधरी, गोविंदराव डाके, कुंडलिक चौधरी,अमृतराव काळोखे, संतोष भोजने, राजेंद्र अहिरे, विलास इंगळे, ऍड मिलिंद घोडेकर, उमेश महाजन, प्रमोदराजे बनसोडे तसेच धाराशिव जिल्ह्यातील शंकरराव बोरकर, तानाजी माळी, ऍड तानाजी वाघमारे, अविनाश माळी, अशोक माळी, दिलीप मेहेत्रे, संतोष चौगुले, बप्पा कोरे, मनोज माळी, रवी गोरे, नानासाहेब खडबडे, रमेश माळी, धीरज आगरकर, प्रताप यादव, दीपक माळी, राजेंद्र गोरे बिभीषण माळी, उमाकांत गोरे, बालाजी माळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छगनराव भुजबळ, अतुलजी सावे, गिरीश महाजन यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
More Stories
संस्थामाता सुमनताई मोहेकर स्मृतिदिन विशेषांकाचे उत्साहात वितरण
साक्षी कोचिंग क्लासेसमध्ये मुख्याध्यापक आनंद रामटेके यांचे उत्साहात स्वागत
अजित पिंगळे यांची शिवसेना धाराशिव–कळंब जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती