August 9, 2025

पाथर्डी शाळेत विद्यार्थ्यांनी बनवल्या गणेश मूर्ती

  • कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी ता.कळंब या ठिकाणी पर्यावरण पुरक इको फ्रेंडली गणपती मुर्ती विद्यार्थ्यांनी तयार केल्या.शाळेमध्ये सर्व शिक्षकांनी मुर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन केले.शाळेच्या विद्यार्थी व्हाॅट्सप वर मुर्ती बनवण्याचे मार्गदर्शक व्हिडिओ शेअर केले.विद्यार्थ्यांनी पालक,भाऊ,बहीण यांच्या मदतीने खुप सुंदर गणेश मूर्ती बनवल्या.सध्या बाजारात तयार केलेल्या अनेक गणेश मुर्ती या पाण्यात विसर्जन केल्यानंतर विरघळत नाहीत,पाण्याचे प्रदुषण होते, पर्यावरणाची हाणी होते.हा संदेश बालमणात रुजावा या हेतूने सदरील ईको फ्रेंडली विद्यार्थी निर्मित गणेश मूर्ती बनवण्याचा उपक्रम उपक्रम मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.या साठी शिक्षक धनंजय गव्हाणे, मनिषा पवार,सरोजिनी पोते, सुरेखा भावले यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!