मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार विद्यालय प्राथमिक प्रशालेमध्ये ५ सप्टे ‘शिक्षक दिन ‘ मोठ्या उत्साहात साजरा .या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहशिक्षिक शेवाळे कमलाकर हे होते .या वेळी शिक्षक दिनानिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .शिक्षकांची महती पटवून सांगितली.यामध्ये कु.आदिती मडके ,कु सानिका बाराखोते,कु . अल्फिया पठाण ,कु .सिमरन पठाण ,कु .अंकिता मते आदीं विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . शेवटी अध्यक्षीय समारोप कमलाकर शेवाळे यांनी केला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.सोनवणे निता यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन श्रीमती.पांचाळ उषा यांनी मानले.यावेळी कु.आदिती मडके यांनी उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल शेवाळे कमलाकर यांनी रोख स्वरूपात बक्षीस यावेळी दिले .या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशालेतील जेष्ठ शिक्षक सोलनकर शहाजी , जाधव मामा ,विद्यार्थी ,विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते .
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
बदलत्या शैक्षणिक युगात शिक्षकांची भूमिका व्यापक झाली – डॉ.अशोकराव मोहेकर
ज्ञान प्रसार विद्यालयात उत्साहात शिक्षक-पालक सभा संपन्न