August 9, 2025

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचा आजच्या युवकांनी आदर्श घ्यावा – प्राचार्य सतिश मातने

  • कळंब – कौटुंबिक परिस्थिती ही सर्व सामान्य असताना देखील आपल्या बुद्धी चातुर्याचा जोरावर भारताच्या सर्वोच्च पदावर जाऊ शकतात याचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा असे प्रतिपादन प्राचार्य सतिश मातने यांनी केले.
    ते शिक्षक दिनानिमित्त छात्राध्यापक व छात्राध्यापिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
    धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील वेद शैक्षणिक संकुलांतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिनानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    पुढे बोलताना प्रा.मातने म्हणाले की, शिक्षकी पेशा हा समाधान देणारा असून डीएड प्रवेशित विद्यार्थ्यांनी अधिकाधिक ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न करावा भविष्यकाळ आपल्या क्षेत्राला खूप महत्त्व येणार असून गुणवंत शिक्षक ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
    यावेळी मराठी विषय प्रमुख प्रा.श्रीकांत पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
    याप्रसंगी डॉ.चौधरी,प्रा.मोहिनी शिंदे, निदेशिका कोमल मगर,निदेशक राजकुमार शिंदे,विनोद कसबे यांची उपस्थिती होती.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी केले तर निदेशक अविनाश म्हेत्रे यांनी आभार व्यक्त केले.
error: Content is protected !!