August 9, 2025

जिल्हास्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत मोहेकर महाविद्यालयाचा संघ प्रथम

  • कळंब – नुकत्याच तालुका क्रीडा संकुल कळंब येथे जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धा पार पडल्या. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील मुलींचा संघ प्रथम येऊन त्यांची विभागीय स्तरावर निवड झालेली आहे. या संघामध्ये रेवती भोसले,रूपाली कुरुंद,प्रांजली भराटे,साक्षी भराटे,अमृता कुरुंद,अपूर्वा भराटे, श्रावणी कुरुंद,संचिता यादव, राधा दिवे,नम्रता धुमाळ,उत्कर्षा टेकाळे यांचा समावेश होता . त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार,उपप्राचार्य प्रा. आप्पासाहेब मिटकरी ,क्रीडा शिक्षिका प्रा.सरस्वती वायभसे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन करुन पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या .
error: Content is protected !!