August 9, 2025

माळकरंजा येथे शिक्षक दिन साजरा

  • कळंब – तालुक्यातील माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना दि.५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षकदिनी चांगलेच सरप्राईज देत अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला.
    शाळेतील शालेय मंत्रिमंडळाने कुठल्याही प्रकारची वाच्यता न होऊ देता अतिशय सुरेख अशा पद्धतीने आज शिक्षक दिनाचे नियोजन केले.शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री असणाऱ्या कु.अंजली लोमटे हिने मंत्रिमंडळातील सदस्यांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन केले. टाकाऊतून टिकाऊ पद्धतीने सुंदर असे बुके तयार केले. उप मुख्यमंत्री विराज शिंदे व क्रीडा मंत्री प्रथमेश गोडसे यांनी मराठी,वाचनमंत्री कु.तनुजा पुदंगे हिने हिंदी तर आरोग्य मंत्री कु. समीक्षा निकम हिने अस्सल इंग्रजी भाषेतून उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना शेरो शायरी, कविता व सुभाषितांच्या माध्यमातून उदबोधित केले. भारताचे राष्ट्रपती भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन, क्रांती सूर्य महात्मा फुले, ज्ञान ज्योती सावित्री माई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून आपल्या सर्वांना मिळालेली ही शिक्षण गंगा वाहती ठेवण्याची जिम्मेदारी पार पाडली पाहिजे असे सांगितले. शाळेत नेमलेल्या स्वयंसेविका कु.मंजुश्री कराड, सह शिक्षक संजय ओहाळ, हनुमंत घाडगे,श्रीमती भरती सूर्यवंशी व मुख्याध्यापक संतोष भोजने यांनीही विदयार्थ्यांना संबोधित केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंजली लोमटे हिने तर आभार प्रदर्शन विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री चि.रोहित शितोळे याने केले.
error: Content is protected !!