कळंब – कळंब येथील तालुका क्रीडा संकुलनावर नुकत्याच पार पडलेल्या तालुका स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचा संघ प्रथम आला. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील हावरगाव रोड येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या वतीने उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेतात.या स्पर्धेत तांबोळी मुजाहीद अकबर (११वी ),शेख आयान मतिन (११ वी),अंगरखे प्रज्वल हनुमंतराव (१२वी),शेख नावाजिश गौस (१२वी) (कप्तान)(C),हर्षद बालाजी शेळके (१२वी),पटेकर यश (११वी),जोशी अवधूत माणिक (१२वी),सानप सोहम अशोक (११वी) (VC),वाघमारे आशिष दत्ता (१२वी),कांबळे अमीत सिधार्थ (१२वी ),आयुष विशाल दिक्षित (११वी ),इटकर रोहित राहुल (१२वी),मोरे अभिनव लक्ष्मण (११वी),क्षीरसागर अनिकेत दिगंबर (१२वी ),निंगुळे आदित्य संभाजी (११वी) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. क्रिकेट स्पर्धेच्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ.सुनील पवार,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,प्रा.आप्पासाहेब मिटकरी,प्रा.वमन, प्रा.भोसले,प्रा. काकडे,प्रा.शेळके,प्रा.पाटील,प्रा. नवगिरे,क्रीडा मार्गदर्शिका श्रीमती सरस्वती वायबसे, अधीक्षक हनुमंत जाधव,उमेश साळुंके तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात