धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.02 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 101 कारवाया करुन 97,950 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
वाशी पोलीस ठाणे: आरोपी नामे-भाग्यश्री नवनाथ शिंदे 49 वर्षे, रा.चिरकाड, पारधी पिढी, पारा ता. वाशी जि. धाराशिव हे दि.02.09.2024 रोजी 16.15 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,540₹ किंमतीची 18 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
वाशी पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- ओंकार शरद गादेकर, वय 31 वर्षे, रा. पार्डी, ता. वाशी जि. धाराशिव यांचे वेल्डींगचे दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन 5 एच. पी. विद्युत पंप, वेल्डींग मशीन,कटर, ग्राइडंर, ड्रील मशीन असा एकुण 50,000₹ किंमतीचा माल आरोपी नामे-संदीपान खेवर्या काळे, वय 55 वर्षे, रा. पार्डी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.01.09.2024 रोजी 04.00 वा. सु. ते दि. 02.09.2024 रोजी 11.30 वा. सु. चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ओंकार गादेकर यांनी दि.02.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 331(4), 305 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-अजित विष्णु नाईकनवरे, वय 35 वर्षे, रा. ढोराळा ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची बजाज मोटरसायकल क्र एमएच 25 एटी 9680 ही दि.17.08.2024 रोजी 22.00 ते दि. 18.08.2024 रोजी 07.00 वा. सु. अजित नाईकनवरे यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अजित नाईकनवरे यांनी दि.02.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-सुरज काका वाघमारे, वय 32 वर्षे, व्यवसाय सेंन्ट्रींग गुत्तेदार रा. शिंगोली ता. जि. धाराशिव यांच्या अंदाजे 30,000₹ किंमतीच्या सेंन्ट्रींग कामावरील लोखंडी प्लेटा या दि. 04.08.2024 रोजी 07.00 वा. सु. पवन पाटील यांचे घराचे बांधाकामावरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरज वाघमारे यांनी दि.02.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण.” भुम पोलीस ठाणे : आरोपी नामे-समाधान महालिंग गिराम, रा. चुंबळी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 01.09.2024 रोजी 17.30 वा. सु. चुंबळी येथे शंभुराज स्टॉलचे समोर फिर्यादी नामे- आबा प्रन्हाद मारकल, वय 55 वर्षे, रा. चुंबळी ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,दगडाने मारहाण करुन जखमी केले. व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आबा मारकल यांनी दि.02.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
येरमाळा पोलीस ठाणे: मयत नामे-रंजित अरुण कागदे, वय 30 वर्षे, रा. मोरगाव ता. जि. बीड हे दि.31.08.2024 रोजी 05.30 वा. सु. चोराखळी शिवारातील साखर काराखान्याचे समोरील एनएच 52 रोडवरुन कार मधून जात होते. दरम्यान ट्रक जी. जे. 06 ए. व्ही 8625 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून ट्रक अचानक डाव्या साईडला घेतल्याने रंजित कागदे यांची कार ट्रकला डाव्या साईडने पाठीमागून धडकून डिव्हायडर मध्ये दबून चिमटून कारचे नुकसान होवून रंजित कागदे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच सदर ट्रक चालक हा जखमीस उपचार कामी दवाखान्यात घेवून न जाता ट्रक जागेवर सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अरुण भाउराव कागदे, वय 60 वर्षे, रा. मोरेगाव ता. जि.बीड यांनी दि.02.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1)(2), 324(4), 324(5) सह मोवाका कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी