February 9, 2026

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.01 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 11 कारवाया करुन 900 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • वाशी पोलीस ठाणे: आरोपी नामे-लक्ष्मण उजण्या काळे, वय 38 वर्षे, रा.गोलेगाव पारधी पीढी, ता. वाशी जि. धाराशिव हे दि.31.08.2024 रोजी 18.30 वा. सु. गोलेगाव शिवारात एनएच 52 हायवे रोडचे बाजूस पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 5,300 ₹ किंमतीची 53 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे- लता किसन काळे, वय 35 वर्षे, रा.सरमकुंडी, ता. वाशी जि. धाराशिव या दि.01.09.2024 रोजी 15.50 वा. सु. आपल्या राहत्या घराच्या बाजूला अंदाजे 1,250 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • मुरुम पोलीस ठाणे: आरोपी नामे-तिपण्णा शंकर राघोजी, वय 48 वर्षे, रा.अचलेर, ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.01.09.2024 रोजी 15.30 वा. सु. शिवनेरी हॉटेल समोर अचलेर गावात अंदाजे 3,200 ₹ किंमतीची 32 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-विनोद मनोहर चेडे, वय 42 वर्षे, रा.वाशी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.31.08.2024 रोजी 20.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 ए 5329 ही जगदाळेमामा कॉलेज वाशी येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • येरमाळा पोलीस ठाणे : दि.31.08.2024 रोजी 19.01 वा. पुर्वी बिड ते धाराशिव जाणारे एनएच 52 हायवे रोडलगत मारुती घोलप यांचे शेताजवळ पिकअप वाहन क्र एमएच 42 एम 6409 चा चालकाने त्याचे ताब्यातील वाहना मध्ये एकुण 2, 81, 100 जर्शी गायची 41 वासरे व म्हैशीचे 4 रेडके असे पिकअपमध्ये दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने जनावरांचे सुरक्षीततेची खबरदारी न घेता दोरीने आवळून बांधून जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करीत असताना पिकअपचे मागील टायर फुटून पिकअप पल्टी होवून जर्शी गायीचे 11 वासरे व म्हैशीचे 1 वासरु मयत झालेले येरमाळा पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 3, 11(1)(एफ) (डी))(एच)(के) मपोका कलम 119, म.पो.अ.83/177,184 प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5,5(अ) (1) (2), 5(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे: दि, 30.08.2024 रोजी 22.00 ते दि. 31.08.2024 रोजी 06.00 वा. सु. दहीवडी शिवारातील इनरिच एनर्जी प्रा.लि.दहिवडी येथील कोअर 6 स्केवअर मीटर केबल 3,428 मीटर सोलार पी व्ही वायर, 6 स्केवअर मीटर केबल 55 मीटर, उम सी 4 कनेक्टर 526 नग असा एकुण 02,07, 610₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तुकाराम लासिंग राठोड, वय 43 वर्षे, व्यवसाय- इनरिच एनर्जी प्रा.लि.दहिवडी ता.तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.01.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 302(2), 324 (4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-सुरेंद्रसिंग करणसिंग बगेल, वय 35 वर्षे, रा. गुगांवली ता. बाह जि. आग्रा ह.मु. रईस लेन गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची बजाज एक्स सी डी मोटरसायकल क्र युपी 80 बीसी 6827 ही दि.31.08.2024 रोजी 21.30 ते दि. 01.09.2024 रोजी 06.00 वा. सु. रईस लेन गल्ली धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुरेंद्रसिंग बगेल यांनी दि.01.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • वाशी पोलीस ठाणे : आरोपी नामे-महादेव मनोहर चेडे, नवनाथ मनोहर चेडे, देवानंद बाबासाहेब चेडे, निखील नवनाथ चेडे, पांडुरंग भगवान चेडे, चैतन्य पांडुरंग चेडे, सुमन नवनाथ चेडे, देवानंद चेडे यांच पत्नी सर्व रा. सारोळा(वाशी) ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 30.08.2024 रोजी 19.00 वा. सु. सारोळा (वाशी) येथे फिर्यादी नामे- मच्छिंद्र किसनराव चेडे, वय 70 वर्षे, रा. सारोळा(वाशी) ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपी मागील भाडंणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी रॉड,काठी, कुह्राडीने मारहाण करुन गंभीर जखमी करुन खिशातील 20,000₹ काढून घेतले. तसेच ‍फिर्यादीचा मुलगा सुर्यकांत मच्छिद्रं चेडे यांना लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीची मुलगी ही भांडण सोडवण्यास आली असता तिसही नमुद आरोपींनी शिवीगाळ करन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मच्छिंद्र चेडे यांनी दि.01.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(2),333, 119(1),118(1), 115(2), 189(2), 191( 2), 191(3),190, 351(3), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे : आरोपी नामे- सुशीला रोहीदास हावळे, रा.बोरी, मोनिका दयानंद उबाळे, सिमा बबलु ओहाळ, अंकिता ओहाळ दोघी रा. भानसगाव ता. जि. धाराशिव, अश्विनी गणेश झेंडे, रा. शिंगोली ता. जि. धाराशिव,हंसराज रोहीदास हावळे, रा. बोरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 01.09.2024 रोजी 17.00 वा. सु. बोरी येथे फिर्यादी नामे-कालीदास नरहरी हावळे, वय 55 वर्षे, रा. बोरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पट्टी, दगड व विटाने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीची पत्नी ललीता व मुलगा किरण हे भांडणा सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण करुन स्टाईल फर्शी फोडून नुकसान केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कालीदास हावळे यांनी दि.01.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 333, 115(2), 189(2), 191( 2), 190, 351(3), 324(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!