-
शिराढोण – लसाकम शाखा कळंबच्या वतीने शिराढोण येथील शरदचंद्र महाविद्यालयात डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी गुणवंत विद्यार्थी सत्कार व व्याख्यान आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब सहाणे,प्रमुख पाहुणे,शांतीलाल चव्हाण,तर व्याख्याते म्हणुन प्रा.शिवाजीराव जवळगेकर होते. यावेळी बालाजी मोटेराव,देडेसर,शहाजी पाटील,या मान्यवरांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमाचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. लसाकम पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना लसाकम तालुकाध्यक्ष दिलीप मोरे ईटकुरकर यांनी अण्णाभाऊच्या कार्याचा गुणगौरव करुन ,लसाकम दरवर्षी मातंग समाजातील मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून गुणवंत विद्यार्थी सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करते.असे सांगीतले.त्यानंतर भावना सहाणे,कृष्णा थोरात,तेजस्वीनी ताटे या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.यावेळी प्रा.डॉ.शिवाजीराव जवळगेकर यांनी मातंग समाजाची दशा व दिशा या विषयावर आपले विचार मांडताना सांगितले की पालकांनी मुलांना शिक्षणामध्ये कुठलीही अडचण येवू देवू नये.मुलां मुलीना चांगल्या प्रतीचे शिक्षण द्यावे. नोकरी, व्यापार,समाजकारण, राजकारण या सर्व क्षेत्रातील सर्वांगीण विकासाकडे झेप घ्यावी.चांगल्या विचारामधे,शक्ती, सामर्थ्य ,बळ आहे, समाजातील मुले मुली शिक्षण घेवुन उच्चपदस्थ झाली पाहिजेत असे प्रतीपादन केले.त्यानंतर अध्यक्षीय समारोपात अबासाहेब सहाणे यांनी संघटनेने शिराढोण येथे कार्यक्रम घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सत्कार करून व व्याख्यान घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
-
त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच दिशा मिळेल असे मत मांडले. कार्यक्रमाचे सुञसंचालन शामराव ससाणे,यांनी तर आभार लसाकम कार्याध्यक्ष बापूराव भंडारे यांनी मानले.यावेळी लसाकम शाखा कळंबचे पदाधिकारी बाळासाहेब कांबळे,शरद एडके,अंकुश कसबे,दत्ता गायकवाड,दिलीप पाटोळे,पांडुरंग शिंदे,प्रकाश कांबळे नानासाहेब ताटे व सामाजिक कार्यकर्ते धनंजय ताटे आणि शिरढोण येथील समाज बांधव किरण सहाने,अक्षय सहाणे,महेश सहाणे,कल्याण सहाणे,अमोल सहाणे,दिपक सहाणे, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.या कार्यक्रमास बहुसंख्य पालक युवक व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
‘दैनिक लोकमत’ समूहातर्फे शिराढोण येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न आला.
खर्च वाचला तर आत्महत्या थांबतील – सत्यपाल महाराज
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर