March 26, 2026

तिरंगा झेंड्या बरोबरच संविधान ही घरा घरात पोहोचवा..!!

  • संभाजीनगर – सरकारने १५ ऑगस्ट रोजी तिरंगा झेंड्या बरोबरच भारताचे संविधान ही प्रत्येक घरात पोहोचवावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस व जय किसान आंदोलन – स्वराज अभियानचे साथी सुभाष लोमटे यांनी सरकारला केले आहे.
    स्वातंत्र्य दिनी प्रत्येक घरात तिरंगा पोहोंचविण्याचा स्तुत्य संकल्प राज्य सरकारने घेतला असून,या संकल्पाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी करणार आहेत. म्हणून त्यांचे मार्फतच तिरंगा झेंड्या बरोबरच भारताच्या संविधानाची प्रास्ताविका ही घरा घरात पोहोचवावी,जेणे करून प्रत्येक घरात ती वाचली जाईल,अशी अपेक्षा आहे.त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून ग्रामपंचायत कार्यालया मध्ये ध्वजारोहण झाल्यावर,सदरील संविधानाचे प्रास्ताविकेचे वाचन तर करावेच, पण संपूर्ण कारभार हा संविधानात सांगितलेल्या नितीमूल्या प्रमाणे व भ्रष्टाचार मुक्त केला जाईल अशी शपथ ही घ्यावी प्रत्येक अशी अपेक्षा पत्रकात व्यक्त करण्यात आली.
    जिल्ह्यातील सर्व शासकीय – निमशासकीय – सहकारी कार्यालयाचे प्रवेश द्वारावर नागरिकांसाठी ची सनद लावून, त्या प्रमाणे सर्व कारभार केला जाईल याची हमी नागरिकांना द्यावी असेही आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.
error: Content is protected !!