March 26, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनांसाठी ऑनलाईन अर्ज केल्याचे तीन प्रतीत सादर करा

  • धाराशिव (जिमाका) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.)च्या जिल्हा कार्यालयाकडे थेट कर्ज योजनेतंर्गत लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आले आहेत.ज्या अर्जदारांनी ऑनलाईन भरले आहेत त्या अर्जदारांनी जिल्हा कार्यालयाकडे 14 ऑगस्टपर्यंत तीन प्रतीत हार्डकॉपी/अर्ज जमा करावे.असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
  • साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने 5 लाख रुपयांची सुविधा कर्ज योजना आणि 1 लाख 40 हजार रुपयांची महिला समृध्दी कर्ज योजना अशा थेट योजना सुरु आहेत.या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी तीन प्रतीत हार्डकॉपी/ अर्ज जमा केला नाही.लाभार्थी अर्जदारांनी 14 ऑगस्टपर्यंत अर्ज जमा करावे.जमा न केलेल्या ऑनलाईन अर्ज रदद समजण्यात येवून कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांनी दिली.
error: Content is protected !!