धाराशिव – प्रियदर्शिनी अर्बन को -आँप बॅंक लि.कळंब शाखा धाराशिव (उस्मानाबाद) च्या ५ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे,धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर,कळंब धाराशिव मतदार संघाचे आमदार कैलास पाटील आणि जेष्ठ नेते जिवनराव गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व मान्यवरांनी बॅंकेचे चेअरमन प्रा.श्रीधर भवर आणि संचालक मंडळ तसेच बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व ओबीसी विकास महामंडळाच्या सर्वाधिक फाईल वाटप करण्याचा विक्रम आपल्या बॅंकेने केला आहे. त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या बॅंकेचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ.बाळकृष्ण भवर, शरद दाताळ,मधुकर बोंदर, जालिंदर वाघमारे,अशोक शेळके,नितीन बागल,दयानंद पाटील,तुषार वाघमारे,मारुती देशमुख,नवनाथ तवले,प्रा.सतीश मातने,अमृत जाधव, घुटे बप्पा, प्रशांत कवडे,शेखर घोडके, रमेश देशमुख ,गाढवे, नितीन भवर,सक्षम न्यूज चॅनलच्या संपादिका सौ.संगिता काळे यांच्यासह बॅंकेच्या संचालक मंडळाचे सदस्य नानासाहेब इखे, विक्रम गायकवाड,भागवत सुरवसे,विजयानंद तांबारे, डॉ.ऋषीकेश भवर,प्रा.सुर्यभान सोनवणे,विलास आडणे तसेच बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप शिंदे,जनरल मॅनेजर आशिष हेड्डा, कर्ज वसुली अधिकारी संतोष गायकवाड व धनंजय चोंदे,बॅंकेच्या आय टी विभागाचे जगदीश सुरवसे, दिलीप देवकते व भिमा हगारे यांच्यासह बॅंकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच असंख्य मित्रपरिवारातील सदस्यांनी दिवसभरात भेटून शुभेच्छा दिल्या.
More Stories
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ
ग्रामोदय समितीच्या संचालकपदी उद्योजक गुंडू पवार यांची एकमताने निवड
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात अभिवादन