कळंब (आकाश पवार) – तालुक्यातील शिराढोण येथे १४ जुलै २०२४ रोजी सकल ओबीसी समाजाच्या जागर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.बैठकीस मराठवाडा अध्यक्ष पै.दीपक जाधव,कळंब तालुका अध्यक्ष शंकर कराड,कळंब तालुका उपाध्यक्ष आकाश पवार,यशवंत सेना कळंब तालुका सचिव झेलम शिंपले,निलेश नाईकवाडे, विशाल सोनके,बालाजी राठोड, पत्रकार बिलाल खुरेशी, शिराढोण शालेय समिती सदस्य गोविंद वाघमारे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी, सतीश शिंपले यांची कळंब तालुकासंघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर सतीश पवार यांची शिराढोण गट प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. या निर्णयामुळे समाजाच्या संघटनेत अधिक बळकटी येईल अशी अपेक्षा आहे. मराठवाडा अध्यक्ष पै.दीपक जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपण आपल्या हक्कासाठी झगडत आहोत. तुमचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपल्या सखल ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळावेत. कोणताही योजना पासून वंचित राहणार नाहीत.” त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी सर्व उपस्थितांचे मनोबल वाढवले.या बैठकीच्या माध्यमातून सखल ओबीसी समाजाच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आणि आपापल्या हक्कांसाठी लढा देण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या निर्णयामुळे समाजातील सदस्यांच्या अधिकारांची पूर्तता होईल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश