June 22, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.12 जैुल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 161 कारवाया करुन 1, 40, 100 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे-गहीनीनाथ उर्फ गणेश महादेव चौधरी, वय 38 वर्षे, रा. डिग्गी, ता. उमरगा, जि. धाराशिव हे दि. 12.07.2024 रोजी 19.30 वा. सु. गणेश महादेव चौधरी यांचे घराचे बाजूचे पत्रयाचे शेडमध्ये अंदाजे 6,700 ₹ किंमतीची 65 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमुद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम65(ई)अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • लोहारा पोलीस ठाणे: आरोपी नामे-कमलाकर रामचंद्र चव्हाण, रा. होळी तांडा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि. 12.07.2024 रोजी 17.00 वा. सु. आपल्या शेतामध्ये होळी तांडा येथे अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमुद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम65(ई)अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) भिमराव बेल्लाप्पा सारणे, वय 48 वर्षे, रा. कास्ती खु. ता. लोहारा जि.धाराशिव हे दि.12.07.2024 रोजी 16.00 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्र एमएच 25 क्यु आर 5178 हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लोहारा जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. आरोपी नामे-2) विशाल शंकर चव्हाण, वय 26 वर्षे, रा. कास्ती बु ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.12.07.2024 रोजी 17.00 वा. सु. आपल्या ताब्यातील टाटा सुमो गाडी क्र एमएच 14 डीएन 6912 ही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लोहारा जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. आरोपी नामे-2) नरेश मनोहर माळवदकर, वय 38 वर्षे, रा. लोहारा बु ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.12.07.2024 रोजी 18.00 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्र एमएच 25- 564 ही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लोहारा जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) ओम भगवान बहिरमल, वय 22 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव हे दि.12.07.2024 रोजी 19.00 वा. सु. आपल्या ताब्यातील अॅपेरिक्षा क्र एमएच 13 बीव्ही हा तेरखेडा ब्रीजखाली रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना येरमाळा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- दिपक सुभाष वडणे, वय 39 वर्षे, रा. माळुंब्रा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची टिव्हीएस व्हिक्टर मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 7267 ही दि. 11.07.2024 रोजी 22.00 ते दि. 12.07.2024 रोजी 06.00 वा. सु. दिपक वडणे यांच्या राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिपक वडणे यांनी दि.12.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-साहेबराव मारुती वनवे, वय 76 वर्षे, रा. मलकापुर, ता. कळंब, जि. धाराशिव यंचे मलकापुर शिवारातील शेत गट नं 104 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे एक डिपी एमएसईबी अंतर्गत योजने खाली 16 एच पी पाणी पुरवठ्यासाठी डी पी मधील कॉपर कॉईल व 60 जि. ऑईल व शेत गट नं 82 मधील व्होल्टा कंपनीचे 10 एच डी पी मधील कॉपर व 50 लि. ऑईल असे एकुण 2,00,000₹ किंमतीचा माल नुकसान करुन चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-साहेबराव वनवे यांनी दि.12.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम 379, 427 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ खुन.”
  • परंडा पोलीस ठाणे: आरोपी नामे-किरण मोहन पवार, उत्तरेश्वर मोहन पवार, ज्ञानेश्वर उर्फ माउली शिवाजी इटकर सर्व रा. सोनारी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 11.07.2024 रोजी 15.30 वा. सु. 15.30 वा. सु. कुंभेजा शिवारातील सिना कोळेगाव कॅनल जवळ मयत नामे- दत्तु भिमा इटकर, वय 55 वर्षे, रा. सोनारी ता. परंडा जि. धाराशिव यांना श्री काळभैरवनाथ देवस्थानाच्या जमीनीचे वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी संगणमत करुन काठ्या व दगडाने जबर मारहाण करुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लता दत्तु इटकर, वय 45 वर्षे, रा. सोनारी ता. परंडा जि. धाराशिव ह.मु. संत तुकाराम नगर वाघोली यांनी दि.12.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 126(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ फसवणुक.”
  • आंबी पोलीस ठाणे: आरोपी नामे-राजन कुमार दास, रा. माधुपुर राज्य झारखंड यांनी दि. 01.07.2024 रोजी 16.26 वा. सु. महाराष्ट्र ग्रामीण बॅक आनाळा येथे फिर्यादी नामे अजित बिभीषन नुस्ते, वय 30 वर्षे, रा. वाटेफळ ता. परंडा जि. धाराशिव यांचा मोबाईल हॅक करुन फोन पे वरुन 1,02,185₹ काडून घेवून अजित नुस्ते यांची फसवणुक झाली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अजित नुस्ते यांनी दि.12.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भारतीय दंड सहिंता कलम 318(4) सह 66 (सी) 66(डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रस्ता अपघात.”
  • उमरगा पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-बाळासाहेब सैन जगताप, वय 32 वर्षे, रा. जकेकुरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव व सोबत मयत नामे- नितीन बसवराज तेली, वय 32 वर्षे, रा. हन्नुर, ता. अक्कलकोट, ह.मु. जकेकुरवाडी, ता. उमरगा, जि. धाराशिव हे दोघे दि.01.07.2024 रोजी 21.15 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 8452 ही वरुन जात होते. दरम्यान अशोक लिलॅड टेम्पो क्र एमएच 25 एजे 2956 चा चालक आरोपी नामे- अरबाज महेबुब बागवान, रा. कासारशिरसी ता. निलंगा ह.मु. हमीदनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी त्यांचे ताब्यातील अशोक लिलॅड टेम्पो हा हायगई व निष्काळजीपणे चालवून बाळासाहेब जगताप यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात नितीन तेली हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर बाळासाहेब जगताप हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. तसेच अशोक लिलॅड टेम्पो चा चालक हा अपघाताची खबर ने देता व जखमीस उपचार कामी घेवून न जाता त्याचे ताब्यातील वाहन हे जागीच सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाळासाहेब जगताप यांनी दि.12.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 281,125(ए), 125(बी), 106(1), सह 134 (अ) (ब), 184 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: मयत नामे-रेखा अंकुश बेरगळ, वय 32 वर्षे, या व सोबत त्यांची मुलगी नामे- अनुष्का अंकुश बेरगळ, वय 06 वर्षे रा. व्यंकटेश नगर नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव या दोघी दि. 11.07.2024 रोजी 09.45 वा. सु. एनएच 65 रोडवर स्मशान भुमी अणदुर जवळुन स्कुटी क्र एमएच 13 सी जी 2106 वरुन जात होत्या. दरम्यान कंटेनर क्र एमएच 46 बीएम 4071 चा चालकाने त्याचे ताब्यातील कंटेनर हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून अचानक ब्रेक दाबल्याने रेखा बेरगळ यांची स्कुटी कंटेनरला पाटीमागून धडकून अपघात झाला. या अपघातात रेखा बेरगळ या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. तर अनुष्का बेरगळ ही किरकोळ व गंभीर जखमी झाली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अभिषेक लक्ष्मण पडळकर, वय 19 वर्षे, रा. पडळकरवाडी ता. आटपाडी जि. सांगली यांनी दि.12.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 281,125(ए), 125(बी), 106(1), सह 184 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
  • “चार मोटरसायकलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात .”
  • मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ/ 504 काझी, पोह/1275 पठाण, पोह/ 289 काझी, पोह/576 पठाण, पोह/929 औताडे, चालक पोअं/484 भोसले असे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता रवाना होवून येरमाळा उडाणपुल येथे आले असता पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, धाराशिव शहर गुरंन 274/2024 कलम 379 भा.द.वि.सं. कलम 379 मधील आरोपी नामे- सैफ इरफान यादगीर रा. सोलापूर हा नविन घरकुल, कुंभारी ता. जि. सोलापूर हा त्याचे राहते घराजवळ गल्लीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिाकणी जावून त्यास 15.50 वा. सु. ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सैफ इरफान यादगीर रा. सोलापूर हा नविन घरकुल, कुंभारी ता. जि. सोलापूर असे सागिंतले. पथकाने नमुद गुन्ह्या संबंधाने त्याच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, मी धाराशिव येथुन 03 व धाराशिव शहरच्या पुढचे गावातुन 01 व अंबाजोगाई येथुन 01 अशा एकुण 05 मोटरसायकली चोरलेल्या आहेत असे सांगितले. त्यावरुन पथकाने गुन्हे अभिलेखाची पाहणी केली असता सदर मोटरसायकल बाबत पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे गुरनं 1) 200/2024 भा.दं.वि.सं. कलम 379, 2)289/2024 कलम 379 भा.दं.वि.सं, धाराशिव ग्रामीण 3) गुरनं 169 भा.दं.वि.सं. कलम 379, अंबजोगाई ग्रामीण जि. बीड 4) गुरनं 298/2023 भा.दं.वि.सं. कलम 379, प्रमाणे गुन्हे नोंद असुन दोन पंचा समक्ष नमुद आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील 04 मोटरसायकल एकुण 1,34,000 ₹ किंमतीचे दि. 11.07.2024 रोजी 19.30 जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस धाराशिव शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.
  • सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ/504 काझी, पोह/289 काझी, पोह/ 576 पठाण, पोह/929, औताडे, पोह/1275 पठाण, चालक पोअं/484 भोसले यांच्या पथकाने केली आहे.
error: Content is protected !!