इटकूर – वृंदावन फाऊंडेशन हे स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील सर्वगुणसंपन्न राष्ट्रीय विचारांचा समाज निर्मितीसाठी अविरतपणे कार्यरत असते, समाजातील प्रश्न काय आहेत याचा अचूकपणे अभ्यास करत त्यावर उत्तर म्हणून शिक्षण, आरोग्य,शेती,पर्यावरण,कला , संस्कृती,विकास आदी परिघात सातत्याने आहे.वारकरी संत व राष्ट्रीय पुरुषांच्या विचारांना प्रमाण मानून सामाजिक एकतेसाठी वृंदावन फाऊंडेशन करत असलेले कार्य स्तुत्य असुन राष्ट्रीय एकात्मता हा विचार अधिष्ठान माणून विविध पातळीवर चाललेले कार्य समाजाला जोडून ठेवणारे असून स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना पुढे घेउन जाणारे आहे. स्वामी विवेकानंद यांच्या चरित्र ग्रंथाच्या वाचनाने संस्कारक्षम वयातच मुला मुलींच्या मनावर योग्य सुसंस्कार होतील सोबतच चित्रकला कीट च्या माध्यमातून त्यांच्यात दडलेल्या सर्जनशिलतेस व्यक्त होण्याची संधी मिळेल .लहान वयातच अशा प्रकारचे साहित्य त्यांच्या हाती पुन्हापुन्हा देता यायला हवे . उद्या भारताचे भवितव्य असलेल्या या पिढीचे योग्य वैचारिक प्रबोधन गरजेचे आहे , फाऊंडेशन त्या मार्गाने काम करत असल्याचे प्रतिपादन सहकारभारती चे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष तौर यांनी केले. ते वृंदावन फाऊंडेशन व संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम कळंब संस्थेच्या वतीने ईटकूर ता कळंब येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चित्रकला कीट व स्वामी विवेकानंद यांच्या चरित्र पुस्तक भेट कार्यक्रमात ते बोलत होते.
@ जि.प.शाळा या विद्यार्थी घडवण्यात अग्रभागी आहेत . लहान मुला मुलींच्या अंगभूत सृजनशीलतेला शोधून त्यांना विकसित करण्यात येथील गुरुजन यशस्वी ठरत आहेत . प्रामाणिकपणे कार्य करत असलेल्या गुरुजनाच्या पाठीशी वृंदावन फाऊंडेशन सारखी संस्था उभी राहत आहे.हे आशादायक असून , सार्वजनिक परिघात कार्यरत इतर संस्थानी या निरपेक्ष कार्याचा आदर्श घ्यावा. – प्रभावतीताई अडसूळ पंचायत समिती सदस्या कळंब
@वृंदावन फाऊंडेशन पुणे व श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम कळंब यांच्या संयुक्त ह भ प महादेव अडसूळ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय प्राथमिक शाळा ईटकूर येथे चित्रकला कीट व राष्ट्र पुरुषांच्या चरित्र पुस्तकाचे विद्यार्थ्यांना भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन गंभीरे , मुख्याध्यापिका शारदाताई मुंडे , तात्यासाहेब येरमाळकर आदी मान्यवर उपस्थित होते . प्रास्ताविक शिवाजीराव गिड्डे पाटील यांनी तर आभार तांबारे यांनी मानले.याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा