June 26, 2025

विठ्ठल नामाच्या गजरात अन्नदाता पुरस्काराचे वितरण

  • कळंब – आषाढी वारीतील वारकरी तसेच हरिनाम सप्ताह यामध्ये गेली अनेक वर्ष आमचे कुटुंबीय अन्नदान करीत आहेत ही सेवा विठ्ठलाच्या कृपयामुळे घडत असून हे आमचे भाग्य आहे यामुळे सर्व कुटुंब सुखी व समाधानी आहे असे विचार खेर्डा तालुका कळंब येथील अन्नदात्या नजमून अजमेर शेख यांनी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित विठ्ठल रुक्मिणी अन्नदाता पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
    कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने आषाढी वारीसाठी कळंब मार्गे श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या पायी दिंडीतील वारकऱ्यांना कळंब शहरातील भक्तांकडून भोजन व्यवस्था केली जाते.अशा भक्तांचा कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी अन्नदाता पुरस्कार देऊन गौरव केला जातो.या वर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा संत ज्ञानेश्वर बालक आश्रम कळंब येथे संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळंब तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक शिंदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक रवी सानप, प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.रमेश जाधवर,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ कळंब,पुरस्कार प्राप्त अजमेर बाबालाल शेख ,नजमून अजमेर शेख व यासीन अजमेर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा असलेले सन्मानपत्र,शाल,श्रीफळ,वृक्षरोप व ऊर्जा स्तंभ हे पुस्तक देऊन कुटुंबीयाचा विठ्ठल रुक्मिणी अन्नदाता पुरस्काराने शेख कुटुंबीयांचा गौरव विठ्ठल नामाच्या गजरात करण्यात आला.
    याप्रसंगी प्रमुख पाहुणे महादेव महाराज अडसूळ,डॉ. रमेश जाधवर यांनी आपल्या मार्गदर्शनात संत परंपरा व अन्नदानाचे महत्त्व सांगून कळंब तालुका पत्रकार संघाकडून अन्नदात्यांचा सत्कार केला जातो, यामुळे पुढील पिढीसाठी प्रेरणा मिळत राहील असे सांगितले, याप्रसंगी बालाजी अडसूळ यांनी मनोगत व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर पालकर यांनी सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार सतीश टोणगे यांनी मानले यांनी मानले .
    कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड,प्राचार्य महादेव गपाट,अशोक शिंपले,सोपान पवार,माजी उपनगराध्यक्ष इंद्रजीत गायकवाड,अॕड,मनोज चोंदे, स्थानिक गुन्हा शाखेचे श्रीराम मायंदे, पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य दिलीप गंभीरे ,ज्ञानेश्वर पतंगे,प्राचार्य जगदीश गवळी,संभाजी गिड्डे,शितल कुमार घोंगडे, सतीश मातने,संदीप कोकाटे,बंडू ताटे,प्रदीप यादव ,अश्रुबा कोठावळे,विशाल कुंभार यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!