कळंब – महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज त्वरित वितरित करावी,पीएमईजीपी चे कर्ज माफ माफ करावी,बाबत जातीचे उत्पन्नाचे रहिवासी व इतर प्रमाणपत्र विना विलंब देण्याबाबत विविध प्रकारचे दाखले त्वरित वितरित करणे बाबत विद्यार्थ्यांना भारत सरकारचे शिष्यवृत्ती त्वरित खात्यात जमा करणे बाबत विशेष अर्थसहाय्य योजनेची मीटिंग त्वरित घेणे बाबत,शालेय कॉलेज स्तरावर विविध प्रमाणपत्र जमा करण्यास मुदत वाढ मिळावी आदी मागण्याचा तात्काळ निपटारा करण्यात यावा अन्यथा लोक जनशक्ती पार्टी कळंब मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनात जनशक्ती पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, कळंब तालुका अध्यक्ष भारत कदम,उप तालुका अध्यक्ष गौतम हजारे,युवा तालुका अध्यक्ष जावेद शेख,शहर अध्यक्ष नागेश धीरे,बाबासाहेब ओव्हाळ, देविदास चिलवंत आदींची उपस्थिती होती.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन