August 9, 2025

दीक्षाभूमी प्रकरणी दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची भारतीय बौद्ध महासभेची मागणी

  • कळंब – दीक्षाभूमी नागपूर येथे अंडरग्राउंड पार्किंगची गरज नसताना देखील शासनाने अंडरग्राउंड पार्किंगचे अतिक्रमण सदृश्य काम सुरू केले असल्याने तेथील नागरिकांनी आंदोलन केलेले आहे. उपविभागीय अधिकारी कळंब व तहसीलदार कळंब यांना भारतीय बौद्ध महासभेतर्फे ८ जुलै २०२४ रोजी निवेदन दिले असून त्यात त्यांनी दीक्षाभूमी नागपूर ही लाखो बौद्धांचे श्रद्धा व प्रेरणास्थान आहे.नागपूर हे देशाचे मध्यवर्ती केंद्र असल्याने १४ ऑक्टोबर १९५६ रोजी याच ठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांनी पाच लाख लोकांच्या उपस्थितीत धम्मदीक्षा घेतली व लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. सन १९५६ ते आज तागायत बौद्ध अनुयायी विजयादशमीला येथे वंदन करण्यासाठी येतात व कोट्यावधी रुपयांची पुस्तके खरेदी करतात.असे असताना शासनाने आता दीक्षाभूमीच्या खालील भागात पार्किंग व्यवस्था करण्याचे कारण पुढे करत काम सुरू केले आहे. मात्र कालांतराने दीक्षाभूमीच्या स्तूपाला कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. पार्किंग अंडरग्राउंड असल्याने सदरचा भाग कमकुवत होऊ शकतो.तसेच ऑक्सिजनचा तुटवडा देखील निर्माण होऊ शकतो. याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा अशा पार्किंगची नागरिकांना गरजच वाटत नाही. म्हणून सदरचे काम काही जागरूक व सुजाण नागरिकांनी थांबविलेले होते. मात्र तेथील नागरिकांवर शासनाने गुन्हे दाखल केलेले आहेत.तेव्हा गरज नसलेल्या अंडरग्राउंड पार्किंग साठी ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते पूर्णतः रद्द करावेत.तसेच राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत बांधलेल्या मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरास ग्रामपंचायत मधील शासनाच्या जंगम व मालमत्ता रजिस्टर ला नोंद घेण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना देण्यात याव्यात. जसे की उदाहरणार्थ या तालुक्यातील लोहटा (पूर्व) तालुका कळंब जिल्हा धाराशिव आशा आशयाचे निवेदन देण्यात आले असून यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार जिल्हाप्रमुख लक्ष्मण धावारे, वंचित बहुजन आघाडीचे अनिल हजारे,सामाजिक कार्यकर्ते आसिफ सत्तार बेग, सेवानिवृत्त कर्मचारी महासंघाचे सी.आर.घाडगे लाल बावटा संघटनेचे कॉम्रेड बजरंग ताटे, मारुती गायकवाड, के पी शिंदे,बालाजी वाघमारे, शिनगारे एस एस, महावीर गायकवाड, लोहटा (पूर्व) येथील भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष रूपसेन ढगे, एच.एन.ढगे,निवृत्ती हौसलमल, घारगाव, खामसवाडी, नायगाव, बोरगाव, वाठवडा या ठिकाणचे शाखाप्रमुख,अमोल सोनटक्के, रामलिंग साखळे, नवनाथ वाघमारे, सावंत एसपी,अमोल पवार,निलावती भास्कर गायकवाड व तालुक्यातील भारतीय बौध्द महासभेचेअसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!