August 9, 2025

विद्यार्थ्यांनी संस्कार, संकल्प आणि सिद्धीकडे यशस्वी वाटचाल करावी – माधवराव पाटील

  • लातूर दि. ०१.०७.२०२४
    महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेची सुरुवात लोकशाहीचे जनक जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या विचाराने झाली असून श्री देशीकेंद्र महाराज यांच्या पावनस्मृतीने ही संस्था उज्वल यश संपादन करीत आहे. त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन विद्यार्थ्यांनी संस्कार, संकल्प आणि सिद्धीकडे यशस्वी वाटचाल करावी असे प्रतिपादन श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील (टाकळीकर) यांनी केले.
    महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचालित महात्मा बसवेश्वर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा व्होकेशनल सभागृहात संपन्न झाला यावेळी ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते.
    या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली.
    यावेळी प्रा. विश्वनाथ स्वामी, गोविंद पवार आणि विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
    पुढे बोलताना माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, आमची शिक्षण संस्था व महाविद्यालय विद्यार्थी सेवा हीच ईश्वर सेवा आहे या विचाराने कार्य करते. आमच्या महाविद्यालयात प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणामध्ये विशेष सवलत दिली जाईल. तसेच विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना पुरस्कारही प्रदान केले जाईल. आम्ही विद्यार्थ्यांसाठी २४ तास ग्रंथालय उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करीत आहोत. विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल प्राप्त करणाऱ्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कमेचे पारितोषकही वैयक्तिकरित्या देण्याची घोषणाही याप्रसंगी त्यांनी केली. विद्यार्थ्यांची दिनचर्या आईपासून सुरुवात होते त्यामुळे महाविद्यालयात प्राचार्य, उपप्राचार्य पर्यवेक्षक आणि शिक्षकांच्या जबाबदारीसोबतच विद्यार्थी आणि पालकांचीही आहे. आमच्या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेत असतील तर आमच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या एकूण प्रवेश शुल्कामध्ये २५ टक्के सवलत ही देण्याची घोषणाही केली.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. संजय पवार करताना म्हणाले की, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयापासून ते विविध महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या नीट व सीईटी सारख्या परीक्षांसाठी पूर्ण तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते.
    यावेळी प्रा. वनिता पाटील म्हणाल्या की, दर रविवारी एम सी क्यू पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाते. वर्षभरात विद्यार्थ्यांच्या २० सराव परीक्षा घेतल्या जातात. ग्रंथालयातून पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जातात. विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी डीएसपी क्लासची सुविधाही उपलब्ध करून दिले जाते.
    पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे म्हणाले की, सध्या स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचं असेल तर विद्यार्थी संस्कृतमधील श्लोकाप्रमाणे सदैव तत्पर जागरूक आणि मेहनती असायला पाहिजे.
    यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, विद्यार्थी हा गुणवंता सोबतच गुणवान बनले पाहिजे. विद्यार्थी आपल्या आई-वडिलांना आदर्श मानून त्यांच्या ऋणात सदैव राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
    यावेळी कार्यकारी संचालक प्रदीपकुमार दिंडीगावे यांनीही शुभेच्छापर मनोगतामध्ये म्हणाले की, महाविद्यालय आणि पालक शिक्षक विद्यार्थी व अभ्यासक्रम असा समुचित शिक्षणाचा वलय असतो. शिक्षकांची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी पालकांची पण असते म्हणून पालकांनीही आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या एकूण दैनंदिन कार्याबद्दलची तंतोतंत माहिती पालकांनी ठेवली पाहिजे असे ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. घनश्याम ताडेवार यांनी केले तर आभार प्रा. एस. एस. पाटील यांनी मानले.
    या मेळाव्याला अकरावी विज्ञान शाखेतील नवोदित प्रवेशित झालेले विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यावेळी निवडक पालकांचा सत्कारही करण्यात आला.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सय्यद जलील, बालाजी डावकरे, शुभम बिराजदार व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
    विद्यार्थ्यांनी संस्कार, संकल्प आणि सिद्धीकडे यशस्वी वाटचाल करावी
    माधवराव पाटील (टाकळीकर) प्रतिपादन
    लातूर दि. ०१.०७.२०२४

error: Content is protected !!