August 9, 2025

महिला बालविकासकडून अनुदानास विलंब – नवनाथ भंडारे

  • कळंब – महिला बालविकास विभाग जि.प.धाराशिव यांच्याकडून पिठाची गिरणी, शिलाई मशीन,पिको फॉल, संगणक आदी वस्तू नव्वद टक्के अनुदानावर महिलांसाठी वाटप करण्यात आले. महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजना असल्या तरी प्रशासनाकडून महिलांची कुचंबना होत असल्याचे मत भारतीय बहुजन परिवर्तन सेनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ भंडारे यांनी सा.साक्षी पावन जवळ व्यक्त केले असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली. पिठाच्या गिरणीचे वाटप होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी अनुदान मात्र अद्दाप मिळाले नाही. हात उसने वेळप्रसंगी व्याजाने पैसे काढून महिलांनी पिठाच्या गिरणी घेतल्या असून त्यांचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांना भारतीय बहुजन परिवर्तन सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
    या निवेदनावर जिल्हाध्यक्ष नवनाथ भंडारे,कळंब तालुका उपाध्यक्ष आश्रूबा शिंदे,सुनील गायकवाड, सुनील कांबळे, महादेव शिंदे,माधवसिंग राजपूत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
error: Content is protected !!