August 9, 2025

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायू वेग पथकाची वाहनावरील कारवाई

  • कळंब (मानसी यादव ) –
    धाराशिव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायू वेग पथकाने कळंब शहरात विविध वाहनावरील कारवाई केली असून शहरातील विना हेल्मेट,फोनवर बोलत वाहन चालवणे,अवैध प्रवासी वाहतूक,खाजगी वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बुधवार (ता.३) कारवाई करण्यात आली आहे.
  • धाराशिव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायू वेग पथकाने शहरातील विविध प्रकारच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कर प्रमाणपत्र नसलेली वाहने, परवाना नसलेली वाहने, विमा नसलेली वाहने, पीयूसी नसलेली वाहने, शिवाय ट्रिपल सीट, ड्रायव्हिंग लायसन नसलेले वाहन चालक अशा वाहनावरती कारवाई करण्यात आली. जवळपास वेगवेगळ्या प्रकाराची अकरा वाहनावरील ही कारवाई करण्यात आली आहे. यामधून संबंधित वाहनधारक यांच्याकडून एक लाख १३००० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कारवाई मधील वाहने कळंब येथील बस आहारामध्ये लावण्यात आल्या होत्या.
  • ही कारवाई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी धाराशिव विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाई दरम्यान मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अजित पवार, वाहन चालक निलेश खराडे, गोरख बोधले यांनी सहभाग घेतला.
  • & पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत नेट आणत असलेल्या स्कूल बसेस सद्यस्थितीत कार्यान्वित आहेत का याची काळजी घ्यावी. शिवाय वाहन चालवत असताना नियमावली चे उल्लंघन करून स्वतः चा व इतरांचा जीवाची पर्वा करा. – महेश रायबान ( मोटार वाहन निरीक्षक )
error: Content is protected !!