August 10, 2025

उपप्राचार्य पंडित पवार यांनी अत्यंत निष्ठेने व उत्साहाने कर्तव्य पार पाडले – डॉ.अशोकराव मोहेकर

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कनिष्ठ महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक तथा उपप्राचार्य पंडित पवार व वरिष्ठ महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य सतीश लोमटे यांच्या सेवापुर्ती निमित्त दि.२९ जून २०२४ रोजी आयोजित सत्कार समारंभाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर उपस्थित होते.
    याप्रसंगी त्यांनी दोन्ही सत्कारमूर्तींच्या सेवेचा, कार्याचा यथोचित गौरव केला. दिलेली जबाबदारी कर्तव्य अत्यंत निष्ठेने व उत्साहाने पार पाडली.तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना आधार देण्याचा प्रेरणा देण्याचा प्रयत्नही केला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी हे दोन्ही उपप्राचार्य म्हणजे एक प्रकारे माझे जणू दोन्ही हात बनून राहिले अशा शब्दातून त्यांचा गौरव केला.संस्थेचे संचालक डॉ. संजय कांबळे यांनी शिस्तप्रियता, तत्परता सारख्या गुणांचा परिचय त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून सतत होत गेल्याचे सांगितले. जे गुण पुढील मार्गदर्शक ठरतात.
    या प्रसंगी प्रा.खोसे,तांबारे,प्रा. नवनाथ झाडके,प्रा.मोहन जाधव ,सतीश लोमटे सरांचे कन्या यांनीही आपले विचार मांडले . विचारपिठावर संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल ,संचालिका प्रा. सौ.अंजली मोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सत्कार मूर्ती पंडित पवार यांनी संस्थेने नेहमी काम करताना कर्मचाऱ्यांना पाठबळ दिले .कुटुंबाचा एक घटक मानणारी संस्था असल्याने काम करताना उत्साह ,आनंद द्विगणित होत गेला.ऊर्जावान बनून काम करण्याची मोठी प्रेरणा मिळत गेल्याचा भाव प्रकट केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुशील शेळके यांनी तर आभार प्रा.डॉ.गणेश पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास बहुसंख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी नातेवाईक शिक्षणप्रेमी मंडळी उपस्थित होती.
error: Content is protected !!