कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त बुधवार दि.26/06/2024 रोजी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे कोषाध्यक्ष बाळकृष्ण गुरसाळे व प्राचार्य.शशिकांत जाधवर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थितीत रासेयो विभाग प्रमुख प्रा.मनिषा कळसकर व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश