August 8, 2025

केज तालुक्यात बायोमेट्रिक हजेरी प्रणालीला मुहुर्त कधी ?

  • ग्रामसेवकांची मनमानी, ग्रामस्थ हैराण !
  • अक्षय गोटेगावकर यांची कारवाईची मागणी!
  • केज (बाबासाहेब शिंदे) – गोटेगावसह केज तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचे आदेश काढून, कार्यवाही केल्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या???. मात्र, अनेक ग्रामपंचायतींनी बायोमेट्रिक प्रणाली बसविली नसून, ग्रामसेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे केज तालुक्यात दिसून येत आहे.
    केज तालुक्यातील अनेक ग्रामसेवक कामाच्या ठिकाणी हजर राहत नसल्याचे तसेच आठवडा आठवडा गायब असल्याचे चित्र केज तालुक्यात पाहावयास मिळते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर वचक आहे की नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करूनही कुठलीही कारवाई झाली नाही. ग्रामसेवक अनेक दिवस कामकाजस्थळी हजर राहत नसल्याने नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे चालला असून, याबाबत वरिष्ठ अधिकारी कधी लक्ष घालणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
  • मागील काही महिन्यापूर्वी अनेक ग्रामसेवक कामाचे गाव सोडून इतर गावात कामकाज करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सम्यक विद्यार्थी आंदोलन व ज्ञानमाता माहिती अधिकार कार्यकर्ते नागरिक समूह महाराष्ट्र राज्याचे नेते अक्षय गोटेगावकर यांनी केज तालुक्यातील शासकीय कामाचा सावळागोंधळ उघड केला होता.
  • एखादा ग्रामसेवक सज्जाचे गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी प्रोसिडिंग बुकवर किंवा निधी कसा देवाण-घेवाण करू शकतो, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज होती. मात्र नोटीस काढूनही ग्रामसेवक वरिष्ठांचे एकच नसतील तर, वरिष्ठांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अक्षय गोटेगावकर यांनी याबाबत तक्रार करत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक प्रणालीवर प्रश्न उपस्थित करून ती बसविण्याची मागणी केली होती. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आदेश ही काढला होता. बायोमेट्रिक प्रणाली बसवून, तसा कार्यवाही अहवाल सादर
    करण्याचे सांगितले होते. मात्र, अनेक ग्रामपंचायतींनी बायोमेट्रिक प्रणाली बसविलीच नाही. ग्रामसेवकांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे. या ग्रामसेवकांवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे केज तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    ग्रामसेवकांवर कारवाई करा तक्रार केल्यानंतर वरिष्ठ
    अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक प्रणाली बसविणे बंधनकारक केले आहे. मात्र, सद्यस्थितीत अनेक ग्रामपंचायतीते बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आलेली नाही. वरिष्ठांचा आदेश न मानणाऱ्या ग्रामसेवकांवर शिस्तभंगासह प्रचलित कायद्यानुसार फौजदारी खटला भरून कारवाई करण्याची मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन व ज्ञानमाता माहिती अधिकार कार्यकर्ते नागरिक समूह महाराष्ट्र राज्याचे नेते अक्षय गोटेगावकर यांनी केली आहे.
  • बायोमेट्रिक प्रणालीमुळे उपस्थितिचे बंधन
  • अनेक ग्रामसेवक कामकाजाच्या स्थळी हजर राहत नाहीत. मात्र शासन दप्तरी हजर असल्याचे दाखविले जाते. त्यामुळे शासनाची फसवणूक होऊन नागरिकांची कामे खोळंबतात. बायोमेट्रिक प्रणालीद्वारे ग्रामसेवकांनी कामाची हजेरी लावणे बंधनकारक असते. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय नियंत्रण राहील, शिवाय ते उलटतपासणी साठी सोपे होते असे गोटे गावकरांनी सांगितले.
error: Content is protected !!