शिराढोण (आकाश पवार) – महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या “महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा” चे भव्य आयोजन शिराढोण येथे मोठ्या उत्साहात आणि सहभागाने पार पडले. या कार्यक्रमामध्ये किसान क्रेडिट कार्ड,बचत गट,आर्थिक वित्तीय साक्षरता आणि डिजिटल बँकिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर शेतकरी आणि ग्रामीण भागातील व्यावसायिकांना अमूल्य मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे चेअरमन मिलिंद घारड, जनरल मॅनेजर दत्तात्रय कावेरी, बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर आर.डी.देशमुख,सहाय्यक सरव्यवस्थापक घोगरे,क्षेत्रीय व्यवस्थापक अविनाश कामतकर. प्रस्ताविक भाषण घोगरे यांनी केले. या कार्यक्रमात ‘ केसीसी नूतनीकरण’ या विषयावर आधारित नाटकाद्वारे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड नूतनीकरणाची प्रक्रिया समजवण्यात आली,ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल बँकिंगच्या फायद्यांबद्दल माहिती देण्यासाठी दुसरे नाटक सादर करण्यात आले, शेतकऱ्यांना विमा योजनेच्या महत्त्वाबद्दल आणि त्याच्या उपयोगितेबद्दल तिसरे नाटक सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमात शिराढोण गावातील आणि परिसरातील सर्व शेतकरी, महिला आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा मानसन्मान आणि सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच श्रीमती लाक्ष्मिताई म्हेत्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य अँड. कांचनमाला संगवे, उमेद गटाच्या सीआरपी प्रतिभा सोमासे, माजी सरपंच पद्माकर पाटील आणि शिराढोण गावातील सर्व पत्रकार वृंदांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान शिराढोण आणि परिसरातील महिलांना रोप वाटप करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या उपक्रमाने महिला स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. कार्यक्रमाच्या शेवटी शाखाधिकारी यांनी आर्थिक वित्तीय साक्षरतेबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना किसान क्रेडिट कार्ड, बचत गट आणि डिजिटल बँकिंगच्या फायद्यांविषयी सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे आभार मानले.पत्रकार आकाश पवार यांच्या निःस्वार्थ सेवाभावामुळे आणि अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. त्यांच्या योगदानामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील व्यावसायिकांना नवचेतना जागृत करण्यास मदत झाली.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश