August 9, 2025

30 जूनपर्यत हरकती व सुचना मागविल्या

  • धाराशिव (जिमाका) – महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली होती. गठित समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 मसुदा तयार केला आहे.प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा 2022 हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाचे https://womenchild.maharashtra.gov.in व https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
  • प्रस्तावित बाल धोरण हे मुळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आले असून त्याचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आले आहे.बाल धोरण व कृती आराखडा यामध्ये आवश्यक बाबी,सुचना,सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुदयामध्ये शब्द रचना,व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना नागरिकांकडून मागविण्यात येत आहे.
    प्रस्तावित महाराष्ट्र राज्य भाग धोरण व कृती आराखडा 2022 च्या संदर्भाने नागरिकांच्या हरकती व सूचना 30 जुन 2024 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत महिला व बाल विकास आयुक्तालय,28 राणीचा बाग,जुन्या सर्किट हाऊस जवळ पुणे 01 या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ईमेल वर पाठविण्यात याव्यात.असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
error: Content is protected !!