बदलापूर – आर पी आय (R.K) चे अध्यक्ष राजाराम खरात यांनी रमेशवाडी-बदलापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर दिनांक ३१ मे २०२४ रोजी दु.१ वाजता शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक सामाविष्ट केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याचा व मंत्र्यांचा जाहीर निषेध केला असून जितेंद्र आवाडाच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनास प्रतिआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याप्रसंगी सुनील दुपटे,सुहास कांबळे,स्वप्नील शिर्के,सुभाष रणपिसे,अशोक दंडवते,वंश जाधव,प्रीतम कदम,मंगेश जाधव, प्रशांत शेलार,महावीर नाईकवाडे, लक्ष्मी गायकवाड,सपना कापडणे, गौरी गायकवाड,श्रद्धा बोऱ्हडे,मयुरी गायकवाड, निशा घोडके,संजीवनी गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
बदलापूरमध्ये ‘प्रबोधन कट्टा’चा शुभारंभ;शिक्षण-करिअर मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ओंकार सोनवणे यांच्या गझल गायकीने रसिक मंत्रमुग्ध
उल्हास नदी बचाव समितीच्या आंदोलनाला यश;अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटीचा दंड