कुशल प्रशासक राजमाता अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे जन्म जन्मलेल्या मल्हारराव होळकर यांच्या सूनबाई,खंडेराव होळकर यांच्या धर्मपत्नी,कुम्हेरच्या लढाईत खंडेराव होळकर वीरगती झाली.मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाऊ दिले नाही.त्यांना घडवलं, धनगर साम्राज्याचा माळवा प्रांताचा कारभार चोख चालविला.अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना धन्य वाटते.संघर्षकन्या प्रेमळ राजमाता,ते लढाऊ रणरागिणी, जागतिक पातळीवर कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, डेन्मार्कची राणी मार्गारेट, यांच्या नावासोबत जोडलेली कुशल प्रशासक म्हणून जागतिक पातळीवर ख्यातकीर्त! एवढेच काय? “स्वराज्य”हे जनतेसाठी,पूर्वजांनी मनगटाच्या बळावर अन् तलवारीच्या जोरावर मिळवले आहे.भाट भडवेगिरी करुन नव्हे ?आसे ठामपणे ठणकावून सांगणा-या अहिल्यादेवी होळकर आजच्या हळदी कुंकू,अन् भोंडला खेळणा-या महिलांना आदर्शवत राजमाता आहेत. सर्व सामान्यांसाठी उभ्या राहिलेल्या माझ्या स्वराज्यासाठी माझे रक्त सांडले तरी चालेल; पण.. तुमच्यासारख्या देशद्रोह्यांचे ,कपट कारस्थान चालू देणार नाही, असे राघोबा पेशव्यांना ठणकाऊन सांगणार्या कष्टकरी शेतकरी, बहुजनाच्या कैवारी अर्थात अहिल्यादेवी होळकर! बुध्दिचातुर्य आणि मनगटाच्या बळावर इतिहासातील ताकदवर राजमाता तीन दशकांच्या जवळपास स्वराज्य सांभाळून, त्यांनी करारी ठसा उमटवला. आदर्श मापदंड निर्माण करणा-या ‘पुण्यश्लोक’ आहिल्यामाई होळकर समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ह्या संविधानिक मूल्यांचा पुरस्कार करणा-या तमाम भारतीयांनी या राजमातेचा आदर्श घ्यावा.हार्दिक शुभेच्छा !! जय अहिल्या! जय संविधान !!
-समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन, उपसंपादक सा.साक्षी पावनज्योत,अध्यक्ष जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स ठाणे जिल्हा ग्रामीण,रूग्णहक संघर्ष समिती सोशल मीडिया ठाणे जिल्हा ,+ ९३२४३३६६७०९
More Stories
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे पैसे का अडवले?” – २०२० च्या पीकविम्यावर आमदार कैलास पाटील विधानसभेत आक्रमक
१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन