August 8, 2025

कु.डाॅ.वैभवी कांबळेचा बुलढाण्यात सन्मानपत्र देवुन गौरव

  • लातूर (दिलीप आदमाने ) – दि.27/5/202 रोजी सम्राट अशोक बुद्ध विहारात जनीय भिक्खु संघाच्या नि भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी,सम्राट अशोका बहुद्देशीय बुद्धीष्ट चॅरीटेबल ट्रस्ट,भिमज्योती येकदिल मित्रमंडळ आणि समस्त गावकरी यांच्या प्रयत्नातुन स्वबळावरती सुंदर बुद्ध विहार निर्माण करत बुद्धभिमाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली.
    यावेळी रमाईकार कु.डाॅ.वैभवी घारगावकर,लातुरने तिचा “मी रमाई बोलतेय..!”चा 183 वा नाट्यप्रयोग सादर केला.नि भिमरमाईचा संदेश आश्रुपुर्ण नयनांनी रसीक श्रोत्यांच्या रुदयात कोरत धम्मपथावरुन धम्माचरणाने चालण्याचा संकल्प प्रबुद्ध होत प्रबुद्ध भारत घडविण्या कामी समर्पीत होण्याचा विचार तिच्या अप्रतीम प्रतिभासंपन्न नैसर्गीक अभिनयातुन सादर केला.तेंव्हा तिला भारतीय बौद्ध महासभा नि संयोजक समीतीने सन्मानपत्र देवुन गौरव केला.तिने जवळपास रमाई,जिजाऊ,सावित्री माईच्या जिवनावरील 271 एकपात्री नाट्यप्रयोग सादर करत विक्रम प्रस्थापीत केलेला आहे.
error: Content is protected !!