धाराशिव – नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार दिले जातात. 2023 सालचा जीवनगौरव पुरस्कार पंडित कांबळे यांच्या कवी, साहित्यिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील, प्रदेशाध्यक्ष देवानंद कांबळे,संस्थेचे मार्गदर्शक डॉ. बलदेव सिंह चौव्हाण, कवी, साहित्यिक, डॉ.सय्यद जब्बार पटेल, मार्गदर्शक सा.ना. भालेराव,माधवराव पाटील झरीकर, प्राचार्य माधव जाधव या संस्थेच्या मार्गदर्शक मंडळांनी पंडित कांबळे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. येत्या काही दिवसात नांदेड येथे महाराष्ट्रातील मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील यांनी कळविली आहे.
पंडित कांबळे हे धाराशिव येथील नगर परिषद शाळा क्रमांक 14 येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करतात. त्यांचे “संदर्भ”, “चरथ भिक्खवे”, “पेटलेल्या शहराच्या कल्लोळात” हे तीन कवितासंग्रह. “नाचा रे नाचा”, “गाणी माझ्या गावची”, “विहार गाणी” हे तीन बालकविता संग्रह. “साहित्यिक प्रवृत्ती :मूल्ये आणि जाणीवा” योगीराज वाघमारे यांच्या प्रस्तावनेचा संग्रह. “उजेडाचा वारस: यु.डी. गायकवाड गौरव ग्रंथ”, “उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेडकरवादी साहित्यिक” व “दत्तांकुर यांच्या निवडक कविता” अशा चार पुस्तकाचे संपादन तर “डॉ.बाबुराव गायकवाड यांचे साहित्य: आशय आणि विश्लेषण” हे समीक्षेचे पुस्तक. अशी 11 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या यातील अनेक पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या अनेक कवितांचा हिंदी अनुवाद प्रकाशित झालेला आहे. अनेक संपादित ग्रंथात लेख व कविता प्रकाशित आहेत. पंडित कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साहित्यिक, मित्र, नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश