February 8, 2026

जय भवानी विद्यालयाची यशाची परंपरा कायम

  • पारा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्ती साठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्र.मुख्याध्यापक एस.डी.भराटे यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी विद्यालय पारा ह्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवण्यात यश आले आहे.
    शाळेचा एस. एस. सी बोर्ड परीक्षा मार्च 2024 चा एकूण निकाल-94.87% लागला असून
    विशेष प्राविण्यासह 15 विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये 11 विद्यार्थी उत्तीर्ण समावेश आहे.
    यामध्ये गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनी ह्या पुढीलप्रमाणे आहेत.ढेंगळे पूजा भाऊसाहेब :- 88.60%(प्रथम ),परभणे स्वाती दादासाहेब :-83.20%
    (द्वितीय ),ढेंगळे गीता बबन :-82.80%
    (तृतीय ),भराटे श्रावणी बबन :-82.80%(तृतीय ),
    शेख सलोनी मजनू :-80.80%
    या सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींचे शालेय समिती जय भवानी विद्यालय पारा, मार्गदर्शक डॉ. अशोकराव मोहेकर ,मधुकरराव ढेंगळे, माजी मुख्याध्यापक दिलीपराव मोरे , प्र. मु. अ. भराटे एस. डी सर, सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
error: Content is protected !!