February 9, 2026

लाचेची मागणी करणारा तलाठी लाच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

  • कळंब – तक्रारदार यांचे भावाचे नावे खरेदी घेतलेल्या शेत जमिनीची नोटीस काढून फेरफार ला नोंद घेण्यासाठी स्वतःसाठी व साहेबाला द्यावे लागतील असे म्हणून यातील आरोपी कल्याण शामराव राठोड धंदा नोकरी पद तलाठी सज्जा आंदोरा,अतिरिक्त कार्यभार ईटकुर तालुका कळंब जि.धाराशिव वय 43 वर्षे याने दिनांक 14/05/2024 रोजी तक्रारदार यांचेकडे 4000/- रु. लाच रकमेची मागणी करून तड
    जोडीअंती 3000/- रु. लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून पोलीस स्टेशन कळंब, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती . आरोपी यास ताब्यात घेण्यात आले आहे.
    सदरील कार्यवाही सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक ला.प्र.वि. मार्गदर्शक – संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर
    सापळा पथकात पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, विष्णु बेळे, सचिन शेवाळे, नागेश शेरकर यांचा समावेश होता.
error: Content is protected !!