धाराशिव (माध्यम कक्ष) – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.7 मे रोजी 60 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या निवडणुकीत उभ्या असलेल्या 31 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले.आज झालेल्या मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथे होणार आहे.
मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती.कडक ऊन लक्षात घेता काही मतदारांनी सकाळी तर काही मतदारांनी सायंकाळी पाच वाजतानंतर मतदान करण्याची वेळ निवडली.त्यामुळे सायंकाळी 6 वाजतानंतर देखील काही मतदान केंद्रावर मतदान सुरू होते.वोटर टर्न आउट अँपवरील माहितीनुसार 60.41 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.औसा – 61.65 टक्के,बार्शी – 64.95 टक्के,उमरगा -64.76 टक्के, उस्मानाबाद – 60.21 टक्के,परंडा – 59.35 टक्के आणि तुळजापूर -61.32 टक्के असे मतदान झाले.मतदानाची टक्केवारी 60.41 इतकी आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी