August 9, 2025

कॅलिफोर्नियात राहून हि छत्रपती शिवाजी महाराज बद्धल आकर्षण

  • कळंब (सतिश टोणगे ) –
    माणूस कुठेही गेला तरी त्याची ओढ नेहमी आपल्या गावाकडेच असते. आपल्या माती शी नाळ जोडण्यासाठी कोणत्याही रूपाने प्रयत्न करत असतो. महाराष्ट्र ही संताची व महापुरुषांची भूमी आहे. त्यांच्यामुळेच काम करण्याची ऊर्जा मिळत असते भारताबाहेर राहूनही संत, महापुरुषाबद्दल ची चित्र रेखाटून त्यांचे महत्व, वाढवण्या साठी कु. मैथीली यशोधरा भावेश पाटील हिने प्रयत्न सुरू केला आहे .
    कळंब येथील ऍडव्होकेट दिलीप सिंह देशमुख यांची मुलगी सौ.यशोधरा भावेश पाटील ह्या माउंटन हाऊस,कॅलिफोर्निया अमेरिका येथे असतात.त्यांची मुलगी कु. मैथिली ही ब्याथिनी एलिमेंटरी स्कूल या शाळेत सातवी च्या वर्गात शिकत आहे.घरात कुणी चित्रकार नसतानाही, तिला लहान पणापासून चित्र रेखाटण्याचा छंद आहे.महाराष्ट्रातील संत, महापुरुष यांच्या बद्धल तिला मोठे आकर्षण आहे.
    भारता बाहेर असणाऱ्या लहान मुलांना याची माहिती नसते व तसे शाळेत हि कुणी देत नाही.पण आता सोशल मीडियामुळे लहान मुले माहिती जाणून घेत आहेत. मैथिली ने सोशल मीडिया चा वापर करून , महापुरुषांचे चित्र रेखाटायला सुरू केले आणि अल्पावधीत सुंदर असे चित्र ती रेखाटत आहे, या कामी शाळेतील शिक्षक, आई वडील तिला मदत करतात.रेखाटलेली चित्रे तिने आपल्या शाळेला भेट म्हणून दिली असून, तिचे कौतुक होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हि जाणून घेवून , तिने महाराजांचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे.
    लहान वयात च मुलांना आपल्या राज्याबद्धल, भाषे बद्धल, माहिती देण्या साठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे.जेणे करून माय मराठी भाषा जगाच्या पाठीवर राज्य करेल.
error: Content is protected !!