August 9, 2025

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना करता येणार मतदान

  • धाराशिव (माध्यम कक्ष) – 7 मे रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.जिल्ह्यातील निवडणूक कर्तव्यावर नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 7725 कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र देण्यात आले आहे.निवडणुकीच्या कर्तव्यावर (ड्युटी) नियुक्त या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्त ठिकाणी किंवा जवळच्या मतदान केंद्रावर मतदान करता येईल.
    उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान करण्यास पात्र कर्मचारी/ पोलीस यांची संख्या 6513 इतकी आहे.यामध्ये पोलीस कर्मचारी/ होमगार्ड यांची संख्या 1212 इतकी आहे.
  • सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी औसा -174,उमरगा – 1499,तुळजापूर -1477,उस्मानाबाद – 1794,परंडा – 1221 आणि बार्शी यांनी 348 कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र दिले आहे.तर पोलीस विभागातील औसा – 33, उमरगा -168,तुळजापूर -312, उस्मानाबाद- 502,परंडा -179 व बार्शी 18 अशा एकूण 1212 पोलीस/ होमगार्ड कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र दिले आहे.
  • उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील औसा- 207,उमरगा- 1667, तुळजापूर -1789, उस्मानाबाद -2296, परंडा- 1400 आणि बार्शी विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या 366 कर्मचाऱ्यांना अशा एकूण 7725 कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र देण्यात आले आहे.निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे.
error: Content is protected !!