मुंबई/धाराशिव (माध्यम कक्ष) – ” लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी धाराशिव जिल्हा प्रशासन सज्ज ” याविषयी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सचिन ओंबासे यांची मुलाखत घेण्यात आली आहे.माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ” दिलखुलास ” कार्यक्रमात मंगळवार ७ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. धाराशिवचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी,लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ,त्यांची मतदार संख्या, निवडणुकीत काम करणारे विविध विभाग,मतदार जनजागृती करण्यासाठी राबविलेला स्वीप उपक्रम,वंचित घटक,ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी व बेघर मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमा,आदर्श आचारसंहीतेचे पालन करण्यासाठी यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात असलेली काळजी, मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी लोकसभा मतदारसंघात हाती घेतलेले उपक्रम,यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नव मतदारांना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी आवाहन केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान