लातुर ( दिलीप आदमाने ) – श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था,लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील सभागृहामध्ये दि. ०५ मे २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या एनटीए नीट परीक्षा २०२४ ची नियोजन बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई हे होते तर विचारमंचावर एनटीए निरीक्षक डॉ.नसीर शेख,उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, केंद्र प्रमुख डॉ.घनश्याम ताडेवाड आणि सहकेंद्रप्रमुख प्रा.व्यंकट दुडिले यांची उपस्थिती होती.
यावेळी उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे प्रास्ताविक करताना म्हणाले की, या परिक्षेमध्ये एकूण ३६० विद्यार्थी, ३० पर्यवेक्षक, ०८ शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. आपण प्रत्येकांनी आपल्या दिलेल्या जबाबदारीप्रमाणे कार्य करावे.
एनटीए निरीक्षक डॉ. शेख निसार म्हणाले की, आपल्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची परीक्षा आपल्याला विना तक्रार पद्धतीने संपन्न करावयाची आहे यासाठी पर्यवेक्षकांनी परीक्षा दालनामध्ये अत्यंत काळजीपूर्वक आणि बिनचूक पद्धतीने काम करावे असे सूचित केले.
केंद्रप्रमुख डॉ. घनश्याम ताडेवार म्हणाले की, या परीक्षेची प्रक्रिया स. ११ पासून सुरुवात होते. प्रथमत: विद्यार्थ्यांची फ्रीस्किंग, रजिस्ट्रेशन व त्यानंतर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जातो. पर्यवेक्षकांना स. ११ पासून ते सायं. ५.२० वा पर्यंत परीक्षा हॉल सोडून बाहेर येता येणार नाही विद्यार्थी वर्गात आल्यापासून ते ५.२० मिनिटापर्यंत परीक्षेची संपूर्ण जबाबदारी अत्यंत गांभीर्याने पार पाडालच अशी अशा व्यक्त केली.
यावेळी पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे यांनीही मार्गदर्शन केले आणि बैठकीचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. व्यंकट दुडिले यांनी मानले.
या बैठकीला महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील कला वाणिज्य विभागातील प्राध्यापक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ बोडके, सय्यद जलील, योगेश मोदी, रंगनाथ लांडगे, सोनाली लोंढे आणि भीमाशंकर सुगरे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन