धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.28 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 91 कारवाया करुन 75,100 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोठाच्या पथकास आरोपी नामे- 1)अमर अनिल मुळे, वय 25 वर्षे, रा. सलगरा दिवटी ता. तुळजापूर जि. धराशिव हे दि.28.04.2024 रोजी 19.40 वा. सु. बाबा टेलर दुकानाच्या बाजूला गंधोरा रोउ सलगरा दि येथे अंदाजे 910 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-2)युवराज नामदेव कांबळे, वय 45 वर्षे, रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.28.04.2024 रोजी 20.05 वा. सु. पत्र्याच्या शेडच्या बाजूला वडगाव देवकडे रोउ लगत सलगरा दि. येथे अंदाजे 990₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 09 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
ढोकी पोठाच्या पथकास आरोपी नामे- 1)काकासाहेब मल्हारी भोसले, रा. आरणी ता. जि. धराशिव हे दि.28.04.2024 रोजी 12.15 वा. सु. आरणी ते सुभा जाणारे रोडवर ता. जि. धाराशिव येथे अंदाजे 5,600 ₹ किंमतीची 70 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
आनंदनगर पोठाच्या पथकास आरोपी नामे- 1)लताबाई सुरेश पवार, वय 55 वर्षे, रा. शिंगोली ता. जि. धराशिव हे दि.28.04.2024 रोजी 13.15 वा. सु. उपळा पाटी ते उपळा जाणारे रोडचे बाजूस पत्रयाचे शेड समोर अंदाजे 34,060 ₹ किंमतीची 300 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 116 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
वाशी पोठाच्या पथकास आरोपी नामे- 1)संजय तुकाराम भोसले, वय 37 वर्षे, रा. ईट, ता. भुम ता. धाराशिव हे दि.28.04.2024 रोजी 17.45 वा. सु. ईट येथील हॉटेल मातोश्री येथे अंदाजे 1,450 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
जुगार विरोधी कारवाई.”
बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.28.04.2024 रोजी 14.30 वा. सु. पाटोदा ग्रामपंचायत दुकानाजवळ रोडच्या बाजूला झाडाखाली छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-1) विकास तात्याराव केदार, वय 45 वर्षे, 2) रघुनाथ अभिमान निलंगे, वय 40 वर्षे, 3) सुधाकर लक्ष्मण ढोले, वय 55 वर्षे, 4)मनोज सहदेव निलंगे, वय 36 वर्षे, 5)किशोर ज्ञानदेव गायकवाड, वय 38 वर्षे, 6) किशोर लक्ष्मण सुरवसे, वय 41 वर्षे, सर्व रा. पाटोदा ता. जि. धाराशिव हे सर्वजन 14.30 वा. सु. पाटोदा ग्रामपंचायत दुकानाजवळ रोडच्या बाजूला झाडाखाली येथे तिरट जुगाराचे साहित्यासह एकुण 1,950 ₹रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.” धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)पंकज भारत मस्के, 2) रत्नदिप सुरेश धकतोडे, 3) राजेश सुरेश धाकतोडे, 4) सुरेश धाकतोडे सर्व रा. देवळाली ता. जि. धाराशिव यांनी दि. 24.04.2024 रोजी 09.30 वा. सु. देवळाली येथे फिर्यादी नामे-अक्षय श्रावण मोहीते, वय 26 वर्षे, रा. देवळाली ता. जि. धाराशिव यांनाव त्यांचे वडील यांना नमुद अरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी करुन फिर्यादीचे बोटावर स्टील रॉडने मारहाण करुन बोट फॅक्चर केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अक्षय मोहीते यांनी दि.28.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 324,323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)प्रविण विठ्ठल चौधरी, 2) वसंत भिमा चौधरी दोघे रा. ढोराळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 28.04.2024 रोजी 02.45 वा. सु. ढोराळा गावातील हनुमंत नाईकनवरे यांचे हॉटेल समोर फिर्यादी नामे- बालाजी उध्दव चौधरी, वय 39 वर्षे, रा. ढोराळ ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आमचे भावा भावा मध्ये पडतो का या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन छातीवर चावा घेवून जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी चौधरी यांनी दि.28.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)बालाजी ध्दव चौधरी, 2) मुन्ना उध्दव चौधरी रा. ढोराळा ता. कळंब जि.धाराशिव यांनी दि.28.04.2024 रोजी 03.00 वा. सु. ढोराळा बसस्थानक येथील जगदंबा हॉटेल येथे फियर्ज्ञदी नाते- प्रविण विइ्ठल चौधरी, वय 40 वर्षे, रा. ढोराळा ता.कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेती मोजण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, विटाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रविण चौधरी यांनी दि.28.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) सोनाली दिगंबर लांडगे, 2)विकास दिगंबर लांडगे, दोघे रा. वाटेफळ ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 28.04.2024 रोजी 06.30 वा. सु. वाटेफळ येथे फिर्यादी नामे- ज्योती अंगत लांडगे, वय 48 वर्षे,रा. वाटेफळ ता. परंडा जि. धाराशिव या नमुद आरोपीस म्हणाल्या की, आमच्या बॅन्लो गाडीचा चालक यास का बोलता असे बोलण्याच्या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्योती लांडगे यांनी दि.28.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
येरमाळा पोलीस ठाणे : मयत नामे- अमित अनिल लगाडे, वय 22 वर्षे, व सोबत नंदकिशोर नवनाथ खंडागळे, वय 29 वर्षे र. दसमेगाव ता. वाशी हे दोघे दि.15.04.2024 रोजी 21.50 वा. सु. एनएच 52 रोडवरील तेरखेड शिवारातील माउली हॉटेल धाबा समोरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एसी 5534 हीवर बसुन जात होते. दरम्यान बोलेरो जिप क्र एमएच 12 जेझेड 0619 चा चालकाने त्याचे ताब्यातील बोलेरो जीप ही हायगई व निष्काळजीपणे चालवून अमित लगाडे व नंदकिशोर खंडागळे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात अमित लगाडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर नंदकिशोर नवनाथ खंडागळे हे गंभीर जखमी झाले. तसेच नमुद बोलेरो जिप चालक हा जखमी यांना उपचारास न नेता बोलेरो जीप जागेवर सोडून पळून गेला. अशा मजकुराच्या मयाताचे वडील फिर्यादी नामे अनिल बन्सी लगाडे, वय 43 वर्षे, रा.दसमेगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.28.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“हायगईने व निष्काळजीपणे वाहन चालवुन किरकोळ व गंभीर दुखापत करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
तुळजापूर पोलीस ठाणे : जखमी फिर्यादी नामे-बळवंत दत्ता बंडगर, वय 23 वर्षे, र. धारुर ता. जि. धाराशिव हे दि.17.04.2024 रोजी 19.00 वा. सु.सोलापूर ते तुळजापूर रोडवर सांगवी गावचे शिवारातील मोरेश्वर पेट्रोलपंप समोरुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.ई. 9478 वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 वाय 5699 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे रॉग साईडने चालवून बळवंत बंडगर यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात बळवंत बंडगर हे गंभीर जखमी झाले. तसेच जखमीस उपचार कामी न नेता मोटरसायकल सह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे बळवंत बंडगर यांनी दि.28.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला