कळंब (आकाश पवार ) – यवतमाळ शहरातील महापुरूषाच्या पुतळा विटंबनेची सखोल चौकशी करून संबधित दोषींवर तात्काळ कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी कळंब येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, यवतमाळ शहरातील महापुरूषाच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, पुतळा परिसरात सी.सी.टिव्ही कॅमरे बसवावेत, पुतळा परिसराला कुंपण करावे, पुतळा परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवावा, पुतळा परिसर स्वच्छ ठेवून विद्युत दिवे लावण्यात यावे, पुतळ्याला छत बसवावे, पुतळा व परिसरात सुशोभिकरण करावे अशी राष्ट्रिय ओबीसी महासंघ यांनी मागणी केली आहे. निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष दिपक जाधव, जालिंदर चव्हाण, धाराशिव जिल्हा अध्यक्ष बप्पा कोरे,अनिल हजारे,धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सतीश वैद्य,तालुका अध्यक्ष शंकर कराड, पत्रकार तथा तालुका उपाध्यक्ष आकाश पवार आदींची स्वाक्षरी आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले