August 8, 2025

मान्यवरांचे स्वागत भारतीय संविधान ग्रंथ देऊन सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न

  • धाराशिव – शहरातील खंडु निवृत्ती झोंबाडे यांच्या मुलीचा मोनल हिचा विवाह काल दि.२६ एप्रिल रोजी सोमनाथ गणपती कलवडे रा.आटोळा जि.लातुर यांचा मुलगा संदीप यांच्याशी महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पार पडला.राजकिय व सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते खंडु आप्पा झोंबाडे हे फुले शाहु आंबेडकर विचारधारेवर चालणारे व्यक्तीमत्व आहे, सत्यशोधक विवाहाची संकल्पना मांडुन आलेल्या रुढी परंपरा याला बाजुला ठेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केल्याचा प्रयत्न केला.स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, आद्यक्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे,क्रांतीकारक म.ज्योतीबा फुले, राजर्षी शाहु महाराज,संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन तर नव वधु वर यांच्या हस्ते म.ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.अक्षदात तांदुळ नव्हे तर फुलांचा अक्षदा उधळुन शुभाशिर्वाद देण्यात आले.या विवाह सोहळ्यास राजकीय सामाजिक सह सर्व क्षेत्रातील जाती धर्माचे लोक अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,आलेल्या मान्यवरांचे स्वागत भारतीय संविधान ग्रंथ व महामानवांच्या जीवनावरील लिखित पुस्तके देऊन करण्यात आले.मुंबई,पुणे व इतर दुरदुरहुन आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली होती,कडक अशा उन्हात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या सह आद्यक्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे,म.ज्योतीबा फुले, शाहु महाराज, राजमाता जिजाऊ,संत गाडगेबाबा, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे व इतर महापुरुषांच्या स्मारकास नव वधु वर यांनी विवाह सोहळा पुर्वी जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.विवाह नंतर जेवणाची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली होती.लहुजी पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपान रामा झोंबाडे,जिल्हाध्यक्ष देवानंद एडके आणि लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मोरे यांनी सुत्रसंचलन करीत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत खंडु आप्पा झोंबाडे यांच्या हस्ते केले.माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर,ज्येष्ठ नेते कानिफनाथ देवकुळे,सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,अॅड.दिलीप पेठे, अंकुश पेठे,मुख्याध्यापक कचरु घोडके सर,पांडुरंग घोडके,अरुण भाऊ माने,शेरखाने, मुकेश शिंदे, पृथ्वीराज देडे,महादेव एडके, विश्वजीत कांबळे,अतुल लष्करे सह अन्य इतर उपस्थित होते.तर झोंबाडे परिवारातील अक्षय झोंबाडे, आकाश झोंबाडे, कुंडलिक झोंबाडे,अरुण झोंबाडे सर्व नातलग महिला भगिनी उपस्थित होते.खंडुआप्पा झोंबाडे यांनी आभार व्यक्त केले.
error: Content is protected !!