August 9, 2025

विविध धर्मातील धर्मगुरूंच्या आशीर्वादाने विवाह सोहळा होणार संपन्न

  • कळंब (प्रा.अविनाश घोडके ) – येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ (अण्णा) तोडकर आणि सौ.अनिताताई तोडकर यांची कन्या डॉ.हर्षदा आणि चि.अक्षय यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन सर्वधर्मसन्मान पद्धतीने करण्यात आलेले आहे.
    या विवाह सोहळ्यास शिख धर्माचे धर्मगुरु हरिनाम सिंगजी खासला नांदेड गुरुद्वारा, बौद्ध धर्माचे धम्म गुरु भन्ते सुमेध नागसेन बुद्ध लेणी खरोसा, ख्रिश्चन धर्म गुरु फादर फादर दिवाकर रेवरेंट चर्च ऑफ नॉर्थ इंडिया,आर्य समाज धर्म गुरु विज्ञान मुनी अंबेजोगाई, मुस्लिम धर्म गुरु हाफ़िज़ मोहम्मद अली चीश्ती कळंब, सत्यशोधक प्रचारक मच्छिन्द्र गवाले नांदेड, लिंगायत समाजाचे नंदकिशोर स्वामी, वारकरी संप्रदाय गुरु प्रकाश महाराज बोधले डिकसळ, लिंगायत समाज धर्म गुरु नंदकिशोर स्वामी कळंब हे सर्व उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद देणार आहेत.
    सर्व धर्मातील शिकवण मानवता धर्म वाढविणारी असून प्रेम, सौहार्द, बंधुभावाचे बंध मजबूत करण्याचीं शिकवण प्रत्येक धर्मात आहे. समाजात, बंधुभाव, परस्पर प्रेम, आणि सर्व धर्माचा सन्मान करण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे.
    भारत सर्व धर्मांचे आश्रय आहे. इथे सर्व जण सुखाने नांदतात. हिंदू-मुस्लिम, बौद्ध, सिख, ख्रिश्चन,लिंगायत,आर्य,अशा सर्वं समाजातील लोकांनीं एकमेकां बद्दल च्या सद्भावना जपल्या पाहिजेत. एकमेका बद्दलच्या सद्भावना वाढवायचे काम धार्मिक कार्यक्रमांमधून अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकते.
    लग्न सोहळा हा सुद्धा एक धार्मिक विधी पद्धतीने संपन्न केला जातो. यामध्ये प्रत्येक धर्मातील लग्न सोहळ्याच्या रितीरिवाजाच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत.परंतु त्यातील संदेश एकच असतो.वधूवरांच्या आयुष्यास आशीर्वाद देण्याची त्यातली एक सुंदर रीत प्रत्येक धर्मात आहे.
    आणि म्हणूनच चि.सौ.कां डॉ. हर्षदा आणि चि.अक्षय यांचा लग्न सोहळा सर्व धर्माचा सन्मान करून संपन्न करण्याचा विश्वनाथ तोडकर यांनी संकल्प केला आहे. त्यासाठी सर्व धर्मातील धर्मगुरूंना सन्मानपर्वक निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये सर्व महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून,सर्व धर्मगुरूंचा सन्मान करून,भारताच्या संविधानाचे पूजन करून,हा विवाह सोहळा संपन्न करण्याचे नियोजन आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपला उद्योग व्यवसाय रोजगार नोकरी कामधंदा हे सर्व समाजातील विविध घटकातील जाती-धर्मातील लोकांच्या आधारेच आपण करत असतो.
    लग्नासारख्या अतिशय आनंदी कार्यक्रमांमध्ये सुद्धा विविध जातीतील धर्मातील आपला सर्व मित्र परिवार एकत्र होतो. म्हणून अशा कार्यक्रमातून सुद्धा एकमेकाप्रती आपलेपणाची भावना निर्माण होण्या साठी सर्व धर्माचा सन्मान करून विवाह सोहळा संपन्न करणे ही अतिशय एक चांगली आणि सुंदर कल्पना आहे.
    लग्नासारख्या अतिशय आनंदी कार्यक्रमांमध्ये सुद्धा विविध जातीतील धर्मातील आपला सर्व मित्र परिवार एकत्र होतो. म्हणून अशा कार्यक्रमातून सुद्धा एकमेकाप्रती आपलेपणाची भावना निर्माण होण्या साठी सर्व धर्माचा सन्मान करून विवाह सोहळा संपन्न करणे ही अतिशय एक चांगली आणि सुंदर कल्पना आहे.
    मी अमुक अमुक जातीत जन्मलो आहे म्हणजे मी अमुक अमुक जातीपुरताच उद्योग व्यवसाय करीन असं जर कोणी म्हटलं तर त्याचा उद्योग व्यवसाय रोजगार उभाच राहू शकणार नाही. म्हणजे समाजामध्ये सन्मानानं जगायचं असेल तर सर्व जाती धर्मातील लोक एकमेकांचा सहभाग देतातच.
    भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना इथे अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण सर्व सार्वजनिक सोयी सुविधा, आणि सन्मानाने राहण्याचा अधिकार बहाल केलेला आहे आणि म्हणूनच भारतीय संविधान सुद्धा आपल्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच लग्न विधी सोहळ्यामध्ये भारतीय संविधानाचे पूजन आणि राष्ट्रगीता उपक्रमाचा आवर्जून समावेश केला आहे.
    समाजामधील आपसा आपसातील दुही, द्वेष, भेदभाव, असुरक्षितता, नष्ट होऊन, आपसा आपसातील नातं अधिक घट्ट झालं पाहिजे, या भूमिकेतूनच. दिनांक २ मे २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता चि.सौ. कां हर्षदा आणि चि.अक्षय यांच्या शुभविवाहचे आयोजन केले आहे. या अनोख्या विवाह सोहळ्यासाठी आपण सर्वं आवर्जून उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजक निमंत्रक यांचे वतीने करण्यात आले आहे.
error: Content is protected !!