February 9, 2026

विश्वनाथ अण्णा तोडकर यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सत्कार

  • कळंब- पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक जमीन अधिकार आंदोलनाच्या चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ अण्णा तोडकर यांची नुकतीच महाराष्ट्र लोकविकास मंचाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.याबद्दल ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने त्यांचा पर्याय संस्था कॅम्पस मध्ये ०२ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ हे होते. याप्रसंगी महादेव महाराज अडसूळ विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी कळंब तालुक्यातील भोगजी या गावातून आपल्या कार्यास सुरुवात केली. गेली ४० वर्ष ते सर्वसामान्य,वंचित घटकातील लोकांसाठी कार्यकरीत असून जमीन अधिकार आंदोलन,एकल महिला,तसेच जलसंधारण,वृक्षारोपण या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे महाराष्ट्र लोक विकास मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी यांची नियुक्ती झाली आहे ही निवड सार्थ अशी आहे असे विचार व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव केला तर सत्कार व उत्तर देताना विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे सहकार्य आशीर्वाद आपल्या पाठीशी असून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जिम्मेदारी आली आहे ही मिळालेली संधी आहे याचा उपयोग वंचित व सर्वसामान्य लोकांना न्याय व हक्क तसेच शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचे सांगितले याप्रसंगी प्रकाश भडंगे,अँड.त्रंबक मनगिरे, मधुकर शीलवंत,विलास करंजकर,कल्याण खापे, पोपट साळवे यांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार निलेश पांचाळ यांनी मानले.
error: Content is protected !!