August 9, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात उत्साहात साजरी

  • कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती पुतळा परिसर समितीच्या वतीने दि.१४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता पुर्णाकृती पुतळ्यास उपस्थित महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर निळ्या ध्वजाचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोपाल तापडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
    यानंतर सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशील,बुद्धपूजा घेण्यात आली.
    याप्रसंगी माजी आमदार दयानंद गायकवाड,शिवाजी कापसे,भागवत धस,विलास करंजकर,रवी ओझा,प्रा.दिलीप पाटील,सी.आर.घाडगे,प्रा.संजय कांबळे,स्मारक समितीचे मार्गदर्शक माजी नगरसेवक सुनील गायकवाड,अध्यक्ष शिवाजी सिरसट,उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,सुमित रणदिवे,के.व्ही.सरवदे,सागर पट्टेकर,लखन हौसलमल,सूयोग गायकवाड,शंकर वाघमारे, किशोर वाघमारे आदींची उपस्थिती होती.
    नंतर समितीच्या वतीने दुपारपासून अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
  • विविध मिरवणुका ठरल्या लक्षवेधी –
    शहरातील भीमनगर, समतानगर, एसबी कंपनी, एकशे एक नगर, शौट प्रतिष्ठान, बायपास चौक जयंती सोहळा, माजी नगरसेवक अमर गायकवाड यांचा लिजेंड ग्रुप आयोजि सोहळा, माजी नगराध्यक्ष किरण हौसलमल यांनी आयोजित केलेले अन्नछत्र, इंदिरानगर, सार्वजनिक जयंती समिती, कल्पनानगर, छत्रपती संभाजी महाराज चौकातून लायन्स ग्रुप, गांधीनगर येथून निघालेला डॉ.बी.आर.प्रतिष्ठानचा सोहळा,स्मृतिशेष मच्छिंद्रदादा गायकवाड़ प्रतिष्ठान, न. प. शेजारील जाणता राजा सामाजिक संघ यांच्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या.
error: Content is protected !!