August 9, 2025

सर्व्हेक्षण सुरू नसल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती

  • धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात VOICE OF YOJNA DARPAN यांच्यामार्फत विविध ठिकाणी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करण्याचे अर्ज भरुन घेण्यात येत आहेत.यामध्ये कुटुंबाचे नाव,प्रवर्ग, पत्ता व संपर्क क्रमांक तसेच जवळपास 24 प्रकारचे प्रश्न विचारण्यात येत आहेत,याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त होत आहेत.जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी केंद्र शासन,राज्य शासन किंवा जिल्हा प्रशासनामार्फत अशाप्रकारचे कुठलेही सर्वेक्षण सद्यस्थितीत सुरु नाही.तसेच याबाबतच्या सर्वेक्षणाला जिल्हा प्रशासनाकडून कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही.तेंव्हा अशाप्रकारचे सर्वेक्षण अर्ज कोणी भरुन घेत असल्यास आपल्या स्थानिक प्रशासनाकडे (ग्रामपंचायत कार्यालय / नगर पालिका) आपण तक्रार दाखल करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
error: Content is protected !!