उस्मानाबाद व ओस्ला, ओॲसीस लेडीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी मंदीर धाराशिव येथे जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने, दिनांक ७ एप्रिल रोजी रविवारी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धा ही ० ते २ वर्ष व २ ते ५ वर्ष वयोगट अशी दोन गटात घेण्यात आली. यामध्ये बालरोग तज्ज्ञ डॉ. अभय शहापूरकर, डॉ. श्रीनिवास हंबीरे, डॉ. प्रसाद धर्म व डॉ. निखिल मुसळे यांनी बालकांची तपासणी व परिक्षण केले यामध्ये ० ते ०२ वर्षे या गटात प्रथम :- श्रेयस श्रीकांत कवठेकर, द्वितीय :- प्रणय विनय सारडा, तृतीय :- कृष्णा आनंद विठ्ठलदास, उत्तेजनार्थ :- ग्रितीक गौरव देशपांडे, श्लोक प्रविण माळी, अजिंक्य प्रतीक देशमुख आणि ०२ ते ०५ वर्षे या गटात प्रथम :- आरोही धीरज मिणीयार, द्वितीय :- समृद्धी हर्षवर्धन सेलमोहकर, तृतीय :- सुरतेज योगेश सुर्यवंशी, उत्तेजनार्थ :- सिध्दी अजित माने अशी पारितोषिके वितरित करण्यात आली. सदरील पारितोषिके मेडरेवो लाईफ सायन्सेस व ॲक्टीस लाईफ सायन्सेस या दोन कंपन्यांनी पारितोषिके प्रायोजित केली होती. या उपक्रमात बालरोग तज्ञांसह रोटरी क्लब उस्मानाबाद चे सदस्य व ओस्ला ओॲसीस लेडीज फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोटेरियन कुणाल गांधी, रोटरी नेत्र रुग्णालयाचे व संजीवन हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले
More Stories
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”
कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच
“जगाला युद्धाची नव्हे,बुद्धाची गरज” – बौद्धाचार्य सुनील गायकवाड