कळंब – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती दि.११ एप्रिल २०२४ कळंब शहरातील आठवडी बाजारातील माळी लॅब येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सालाबादाप्रमाणे यंदाही माळी लॅब च्या वतीने सार्वजनिक मोफत पाणपोई सुरू करण्यात आली.पाणपोईचे उद्घाटन माळकरंजा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ धाराशिवचे जिल्हाध्यक्ष संतोष भोजने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महात्मा फुले बचत गटाचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र खडबडे,सचिव अरुण माळी,टी.जी.माळी,लालासाहेब धोंगडे,ओबीसी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष दिपक जाधव, धाराशिव जिल्हाध्यक्ष ज्योतिराम बप्पा कोरे, तानाजी गोरे,डॉ.तापडिया,बाळासाहेब बाबर,मोहिते, राऊत,जिंवणसिह ठाकूर,करंजकर दादा,शुभम करंजकर,ज्ञानेश्वर तोडकर,सचिन डोरले, अचपळ कवडे,आकाश माळी,धीरज दुधाळ,बालाजी खंडाळे, श्रवण जाधव ,भडंगे यांच्यासह बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले