धाराशिव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा )- आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू असून विविध कक्ष पूर्ण क्षमतेसह कामाला लागलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच पहिले प्रशिक्षण पार पडलेले आहे. त्याच बरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे साहित्य कक्ष वेगाने कामाला लागला आहे. सर्व मतदान केंद्रावर पुरविण्यात येणारे संविधानिक स्टेशनरी साहित्य यांची तपासणी करून आवश्यक तितक्या संख्येत मतदान केंद्रावरील साहित्य तयार करण्यात येत आहे. दि.७ एप्रिल २०२४ रोजी कक्षात कार्यरत अधिकारी कर्मचारी रविवारी ही आपले कर्तव्य बजावत असताना दिसले. सदर पथकामध्ये नायब तहसीलदार, तलाठी, शिक्षक, कोतवाल इत्यादींच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. अशी माहीती कळंब तालुका पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे यांनी दिली आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला